नागपूर : नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. पटोलेंनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गृह जिल्ह्यातच नाना पटोले यांना घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक झालेत. (BJP MP Sunil Mendhe on Congress State President Nana Patole ahead of Bhandara Gondia ZP Election)
धान उत्पादकांसाठी भाजप आक्रमक
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल दौरा झाल्यानंतर आता भाजप खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) आक्रमक झाले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या धान उत्पादकांच्या समस्यांसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. धान खरेदी, बोनस, धान खरेदी घोटाळा हे प्रश्न मार्गी लागले नाही, तर आंदोलनाचा इशारा भाजपने दिला आहे.
पटोलेंचे गृह जिल्ह्याकडे दुर्लक्ष, मेंढेंचा आरोप
नाना पटोले यांचं जिल्ह्याकडे लक्ष नाही. कोव्हिड काळात ते फिरकले नाहीत. फक्त भाजप नेते-कार्यकर्ते काम करत होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं लक्ष नव्हतं, असा आरोप सुनील मेंढे यांनी केला आहे. धान उत्पादकांना दिलासा मिळाला नाही, तर मोठं आंदोलन करु, असा इशाराही पटोलेंनी दिला.
मुद्दा धान उत्पादकांचा असला तरीही भाजपचा डोळा आगामी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीवर आहे, हे साहजिक मानलं जातं. त्यामुळे गृह जिल्ह्यात नाना पटोले यांना घेरण्याची तयारी भाजप करत असल्याचं चित्र आहे. (Sunil Mendhe on Nana Patole)
पाहा व्हिडीओ :
नाना पटोलेंची मोदींवर टीका
पंतप्रधान मोदींची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी अश्रू ढाळत असतील तर जनता मान्य करणार नाही. बनारस मॉडेलमध्ये गंगेत मृतदेह वाहत आहेत. त्यांचं ते स्वप्न असेल तर त्यांना कळायला हवं की कुत्र्या-मांजरासारखं लोकांना मरायला सोडलंय. त्यांचा हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी मोदींवर केलीय.
संबंधित बातम्या :
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकारण करु नये : नाना पटोले
VIDEO: कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
(BJP MP Sunil Mendhe on Congress State President Nana Patole ahead of Bhandara Gondia ZP Election)