उदयनराजे यांचा ताफा रायगडाच्या दिशेने, राजकीय घडामोडींना वेग, शिवसन्मान कार्यक्रमात काय गर्जना करणार?

आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास उदयनराजे सभा घेतील आणि पुढची दिशा स्पष्ट करतील.

उदयनराजे यांचा ताफा रायगडाच्या दिशेने, राजकीय घडामोडींना वेग, शिवसन्मान कार्यक्रमात काय गर्जना करणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 9:37 AM

पुणेः छत्रपती शिवरायांप्रती (Chatrapati Shivaji Maharaj) अपमानजनक वक्तव्यावरून धुसपूस आणि सत्ता संघर्षातील शह-काटशहाचं राजकारण यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आलाय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या आजच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. छत्रपती शिवरायांचे वंशज आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) बडं प्रस्थ असलेले उदयनराजे सकाळीच रायगडाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान होणारं वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांत संताप आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची आक्रमक मागणी केली आहे. भाजपचे असूनही खासदार उदयनराजे यांनी पक्षश्रेष्ठींना यावरून इशारा दिला होता.

राज्यपालांविरोधात भाजपने कठोर भूमिका घेतली नाही तर मी टोकाचा निर्णय घेऊ शकतो, असे उद्गार उदयनराजे भोसले यांनी काढले होते. आज 3 डिसेंबर रोजी रायगडावर मोठी सभा घेत माझी भूमिका स्पष्ट करेन, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही भाजपच्या वतीने राज्यपालांविरोधात काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

इशाऱ्याप्रमाणे खासदार उदयनराजे आज सकाळीच रायगडाच्या दिशेने निघाले आहेत. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास उदयनराजे सभा घेतील आणि पुढची दिशा स्पष्ट करतील.

मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही, माझ्यावर कारवाई करणारा अजून जन्माला यायचाय.. भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून हा विषय सुटणारा नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.

रायगडावर शिरकाई आणि जगदिश्वर मंदिरात अभिवादन केल्यानंतर उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करतील. रायगडावर शिवसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे मेळाव्याला हजारो शिवभक्त हे रायगड जमलेले आहेत.

उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे आज या मेळाव्यात ते कोणती भूमिका जाहीर करणार हे पाहणं महत्वाचं आहे..

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.