उमेदवारी अर्ज भरताना आई-वडिलांची अनुपस्थिती, सुजय विखे गहिवरले

अहमदनगर : भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याअगोदर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. यावेळी तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आई-वडिलांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आलं. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई-वडिलांची आठवण येते. मात्र माझ्या सोबत असलेले असंख्य कार्यकर्ते हेच माझे आई-वडील […]

उमेदवारी अर्ज भरताना आई-वडिलांची अनुपस्थिती, सुजय विखे गहिवरले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

अहमदनगर : भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याअगोदर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. यावेळी तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आई-वडिलांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आलं. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई-वडिलांची आठवण येते. मात्र माझ्या सोबत असलेले असंख्य कार्यकर्ते हेच माझे आई-वडील आहेत, असं भावनिक वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.

जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आलेत. कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे प्रेम दिलं ते आधारस्तंभ आमच्यासोबत आज नाहीत. द्वेषाच्या राजकारणामुळे माझ्या आई वडिलांना येता आलं नाही. माझे काका या ठिकाणी आले आहेत. पण आई-वडील नसल्याची सल मनात आहे. पक्ष कुटुंब म्हणून काम करतील आणि आई वडिलांची कमी पडणार नाही. मी आई वडिलांना भेटायला गेलो, आशीर्वाद घेतला. मुलगा या नात्याने मी आशीर्वाद घेऊन आलो, असंही सुजय विखे म्हणाले.

त्याआधी ग्रामदेवता विशाल गणपतीची आरती करून सुजय विखेंनी पूजा केली. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन केलं. अर्ज भरण्याच्या वेळी त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी जिल्ह्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, पशुसंर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. स्नेहलता कोल्हे, आ. मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अभय आगरकर, शिवसेना, भाजपसह सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे नाराज असलेले खासदार दिलीप गांधी देखील सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. 1 एप्रिलचा मुहूर्त साधत सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असून देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाची एक हाती सत्ता येणार असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला.

VIDEO : आई-वडिलांच्या अनुपस्थितीवर सुजय विखे काय म्हणाले?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.