ठाकरेंची औकात, शिवराय, राऊत, जेल अन् बरंच काही, राणेंच्या पत्रकार परिषदेतील शब्द अन् शब्द
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे, असं म्हणत त्यांनी एकएक मुद्दा पुढे मांडत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी काल अकलेचे तारे तोडले. भाजप नेत्यांवर टीका केली त्याला उत्तर म्हणून पत्रकार परिषद घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बैठकांमधील बदल
याआधी उद्धव ठाकरे मंत्री, आमदार, खासदारांच्या बैठका घ्यायचे. आता ते गटनेत्यांची बैठक घेत आहेत. असं राणे म्हणालेत. केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल ते बोलले, निराशेच्या भावनेतून बोलले. त्यांचं भाषण त्याच भावनेतून होतं, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.
सेनेची स्थापना अन् उद्धव ठाकरे
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना विविध मुद्द्यांवरून घेरलं आहे. शिवसेना जन्म झाला त्यावेळी उद्धव ठाकरे तुम्ही 6 वर्षाचे होता. शिवसैनिक आंदोलन करत होते.जेलमध्ये जात होते. तेव्हा तुम्ही कुठे होता? सत्तेवर यायला सैनिकांनी त्याग केला. उद्धव, आदित्य यांचा अंशभर संबंध नाही. आता कुणाच्या जीवावर अस्मान दाखवण्याची भाषा करता?, असं राणे म्हणालेत.
ठाकरेंची औकात काढली!
मेवा आणि तूप मातोश्रीने खाल्लं. आता त्यांना गटप्रमुख आठवले. अडीच वर्षे सत्ता असताना किती गटनेत्यांना भेटले? उचलली जीभ लावली टाळ्याला असं म्हणत असतानाच राणेंनी ठाकरेंना त्यांची औकात विचारली.
काय महाराष्ट्र राज्य मराठी माणसाला दिलं?, असा सवालही राणेंनी विचारला आहे. लबाड लांडगा, मी उद्धव ठाकरेंना उपमा देतो, असंही ते म्हणालेत.
शिवरायांची बदनामी!
हिंदुत्वाच्या नावावर यांनी मिळवलं. घर चालवलं. शिवाजी महाराजांच्या नावावर सेना चालवली. त्यांची बदनामी केली, असं म्हणत राणेंनी ठाकरेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राऊत आणि जेल
स्टेजवर एक खुर्ची संजय राऊतांसाठी रिकामी ठेवली. ते तर जेलमध्ये आहेत. असं असताना संजय राऊत यांची खुर्ची ठेवण्यात आली, असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या कालच्या सभेवर टीका केलीय.