उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणे मिश्किल हसले आणि म्हणाले…
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलंय.
मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असं नारायण राणे म्हणाले. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही राणे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला जाणार का अस वितारण्यात आलं तेव्हाही त्यांनी असंच उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे यांनी आमंत्रण दिलं तर मी जरूर जाईल, असं राणे म्हणाले आहेत.
दसरा मेळावा
यंदाचा दसरा मेळावा खास आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर काय टीका करणार, भाजपला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.
शिवसेनेत दोन गट झाल्याने पक्ष विभागला गेलाय. अशात आता एकनाथ शिंदेदेखील दसरा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यातून शिंदे उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.
लक्ष शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानाकडे!
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. शिंदेगटानेही या मैदानाची मागणी केली होती. पण अखेरीस शिवसेनेला हे मैदान मिळालं आहे. अन् शिंदेगटाचा दसरा मेळावा वांद्रेतील बीकेसी मैदानावर होणार आहे.