सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या, वैभव नाईकांचा आरोप

लोकसभेचं अधिवेशन सोडून राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून राहावं लागलं (Narayan Rane Vs Vaibhav Naik )

सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या, वैभव नाईकांचा आरोप
Vaibhav Naik narayan rane
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 2:53 PM

सिंधुदुर्ग : फक्त सिंधुदुर्गच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर तर भाजपकडून राणे समर्थक असलेल्या कणकवलीच्या संजना सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र दोन्ही पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या वेळेला ही निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अध्यक्ष निवडीवरुन भाजप खासदार नारायण राणे यांना (Narayan Rane) लक्ष केलं. (BJP Narayan Rane Vs Shivsena Vaibhav Naik in Sindhudurg ZP President Election)

राणे पितापुत्र सिंधुदुर्गात ठाण मांडून

राणे पिता-पुत्र या निवडणुकीत स्वतः लक्ष ठेवून आहेत. लोकसभेचं अधिवेशन सोडून राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून राहावं लागलं. यावरून राणेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं दिसून येत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षानी आपलाच विजय होईल असा दावा केला आहे. शिवसेनेला या निवडणुकीत जंगजंग पछाडावं लागलं आणि थेट मातोश्री कनेक्शन या निमित्ताने उघड झालं. राणेंच्या बालेकिल्ल्यात एखादा चिरा ढासळतो का हे पाहण्यासाठी मातोश्रींला थेट हस्तक्षेप करावा लागला, असा आरोप भाजपकडून केला गेला.

सतिश सावंतांवर फोडाफोडीचा आरोप

भाजपकडे पुरेस संख्याबळ असलं तरी काही सदस्य शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही सगळी परीस्थिती हाताळण्यासाठी नारायण राणे आणि नितेश राणे हे सिंधुदुर्गात तळ ठोकून आहेत. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते सतिश सावंत यांच्यावर सदस्य फोडीवरुन गंभीर आरोप केले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा हस्तक्षेप : नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. यासंदर्भात बँकेचे कर्ज घेतलेल्या काही जिल्हा परिषद सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून आपल्यावर जप्ती येऊ नये यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांना येऊन भेटा अशी धमकी देत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. (BJP Narayan Rane Vs Shivsena Vaibhav Naik in Sindhudurg ZP President Election)

राणेंची उमेदवार निवडीसाठी तडजोड, शिवसेनेचा दावा

शिवसेनेनेही राणेंना शह देण्यासाठी रणनीती आखल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अध्यक्ष निवडीवरुन राणेंना लक्ष केलं. राणेंना उमेदवार निवडीसाठी सुद्धा तडजोड करावी लागली, हीच शिवसेनेची ताकद आहे. स्वतः राणेंना अध्यक्षपदाच्या निवडीत सदस्यासमोर दयायाचना करावी लागली. काही ठिकाणी शपथ घ्याव्या लागल्यात तर काही जणांना आमिष दाखवली, तर काहींना धमकावलं, असा थेट आरोप वैभव नाईक यांनी राणेंवर केला.

संबंधित बातम्या :

सिंधुदुर्ग ZP : भाजपचे 31, शिवसेनेचे 19; तरी राणेंना धक्का देत शिवसेनेचा अध्यक्ष बसणार?

सिंधुदुर्ग ZP अध्यक्ष निवडणूक : राणे पितापुत्र तळ ठोकून, शिवसेनेवर सदस्य फोडाफोडीचा आरोप

(BJP Narayan Rane Vs Shivsena Vaibhav Naik in Sindhudurg ZP President Election)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.