नितेश राणेंची ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टीका, म्हणाले….
भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (BJP Nitesh Rane criticizes shivsena)
मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या (bruck pharm) मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता 50 हजार रेमडेसिव्हीर जनतेसाठी स्वत:च्या ताकदीवर आणून दाखवा, नाहीतर स्वत:ला मर्द म्हणणं तरी बंद करा, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. (BJP Nitesh Rane criticizes shivsena on Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)
“स्वतः करायचे नाही… आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही.. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा ! नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा!” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
स्वतः करायचे नाही… आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही..
तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा !
नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा!
स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं, तर हे ‘येडझवं सरकार आहे’ ! @Dev_Fadnavis
— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2021
नेमका प्रकार काय?
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पोलिसांचं म्हणणं काय?
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (BJP Nitesh Rane criticizes shivsena on Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)
संबंधित बातम्या :
‘दुपारी मंत्री दम मारतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं’
उदयनराजे भोसलेंनी कटोरा घेऊन जमवलेले 450 रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी मनीऑर्डरने परत पाठवले
प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही; आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं अजब कारण