‘असं’ बोलणार तर हल्ले होणारच’… भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नितेश राणेंची प्रतिक्रिया
भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक झाली. घराच्या आवारात स्टंप तसेच पेट्रोलने भरलेल्या बाटल्या दिसून आल्या.
तुम्ही अशा पद्धतीने राणेंविरोधात बोलणार असाल तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. महाराष्ट्रात राणेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यांना आम्ही कुठपर्यंत शांत बसवणार, असा सवाल नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhakar Jadhav) यांच्या घरावर काल मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. जाधव यांच्या चिपळूण (Chiplun) येथील घरावर मध्यरात्रीतून दगडफेक झाली. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, हल्ला नेमका कुणी केला हे शोधून काढणं आता पोलिसांचं काम आहे. पण अशा पद्धतीने बोलल्यावर प्रत्युत्तर मिळणारच…अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी टीव्ही9 शी फोनवर बोलताना दिली.
नितेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणेंना मानणारा वर्ग आहे. तुम्ही राजकीय वक्तव्य करायची असतील तर करा. पण खालच्या पातळीवरून बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने रिअॅक्शन देणारच… कुणाकुणाला थांबवणार? असा सवाल राणेंनी केला.
भास्कर जाधव यांना या पद्धतीने बोलण्याची सवय असेल तर त्यांनी हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय.
काल भास्कर जाधव यांनी भाषण दिलं आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातून पळून गेला… आम्हासा राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडवायची नाहीये. पण कार्यकर्ते पण बघतायत… राजकारण सोडून कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळीवर बोलत असेल. तर कार्यकर्त्यांना नियंत्रणात कोण ठेवणार, असा सवाल नितेश राणे यांनी केलाय.
पाहा भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला—
भास्कर जाधव यांचे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या भाषणांमध्ये ते शिंदे-भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. कालच्या कुडाळ येथील कार्यक्रमातही त्यांनी टीका केली. त्याचेच पडसाद म्हणून मध्यरात्री त्यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला झाल्याचं बोललं जातंय.
भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक झाली. घराच्या आवारात स्टंप तसेच पेट्रोलच्या बाटल्या आढळून आल्या.