उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच!

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे.

उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच!
Follow us
| Updated on: Oct 30, 2019 | 11:31 AM

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे. यासाठी भाजप शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह तब्बल 16 मंत्रिपदं देण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल. तसेच राज्यातील महत्त्वाची दोन मंत्रीपद शिवसेनेला देण्याची तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला 16 विविध मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली आहे.

मात्र भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्याशिवाय शिवसेनेला गृहमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री ही महत्त्तवाची खाती सोडण्यासही भाजपने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे.

दरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या बोलणीसाठी काल  (29 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात याबाबतची बोलणी होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे. यामुळे ‘मातोश्री’ मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. या विधानामुळे शिवसेनेकडून ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवलं आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.