बिहारमध्येही महाविकास आघाडीसारखंच चित्र शक्य, कट्टर विरोधक एकत्र येणार?

मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेतून बिहारमध्ये भाजपने नितीशकुमार यांच्या जेडीयूवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तर जेडीयूही आघाडी तोडून विरोधीपक्षांसोबत सत्ता स्थापन करेल, आणि भाजप पुन्हा सत्तेबाहेर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे

बिहारमध्येही महाविकास आघाडीसारखंच चित्र शक्य, कट्टर विरोधक एकत्र येणार?
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 4:39 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election) पासवान कुटुंबाच्या लोक जनशक्ती पक्षाने (लोजप- LJP) भाजपप्रणित एनडीए आघाडीतून (NDA)  बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केंद्रात एनडीएसोबत असलेल्या लोजपने बिहार निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला. भाजप-जेडीयू-लोजप यांची आघाडी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या नेतृत्वातील राजदप्रणित ‘महागठबंधन’ला क्लीन स्वीप देईल, असं सप्टेंबरअखेरपर्यंत मानलं जात होतं. मात्र लोजपच्या पवित्र्याने बिहार विधानसभेचं त्रांगडं वाढलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेतून बिहारमध्ये भाजपने नितीशकुमार (NitishKumar) यांच्या जेडीयू (JDU) वर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्राप्रमाणेच जेडीयूही आघाडी तोडून विरोधीपक्षांसोबत सत्ता स्थापन करेल, आणि भाजप पुन्हा सत्तेबाहेर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (BJP plans to stop Nitishkumar in Bihar Vidhansabha Election might turn into Maha Vikas Aghadi like Situation otherwise)

बिहारमधील 2015 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जेडीयूने भाजपचा हात सोडून ‘महागठबंधन’मध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्रिपद उपभोगल्यानंतर 2017 मध्ये त्यांचे संबंध फिस्कटले आणि जेडीयू पुन्हा भाजपच्या आश्रयाला आला. भाजपशी पुन्हा हातमिळवणी केल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपद स्वतःकडेच राखलं. मात्र आता जास्त जागा जिंकून भाजप मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर 15 वर्षांपासून विराजमान असलेल्या नितीशकुमार यांना पर्याय हवा, अशी लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांची मागणी आहे. पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार व्हावेत, असा त्यांच्या पक्षातील नेत्यांचा होरा आहे. परंतु वेळ पडलीच तर पासवान भाजपच्या बाजूने उभे राहतील. त्याचं पहिलं कारण म्हणजे लोजप केंद्रात मोदी सरकारसोबत सत्तेत आहे. रामविलास पासवान यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आहे. दुसरं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएपासून फारकत घेऊनही लोजपने भाजपविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जेडीयूच्या उमेदवारांविरोधात लोजप मैदानात उतरेल.

भाजपसोबत लढल्याचा जेडीयूला फायदा

भाजप-जेडीयू यांनी 2010 मध्ये एकत्रित निवडणूक लढवली होती. जेडीयूने लढवलेल्या 141 जागांपैकी 115 जागांवर विजय मिळाला. त्यांना 22.61 टक्के मतं मिळाली होती. तर 2015 मध्ये जेडीयू महागठबंधनमध्ये असताना लढवलेल्या 101 जागांपैकी 71 जागाच त्यांना मिळवता आल्या. मतांची टक्केवारी 17 टक्क्यांवर होती. त्यामुळे एनडीएसोबत असताना जेडीयूला भाजपची मतं मिळाल्याने त्यांची कामगिरी सुधारल्याचे दिसते.

भाजपची मतं जेडीयूकडे जाण्यापासून रोखण्यासाठीच लोजप स्वतंत्रपणे आखाड्यात उतरल्याचे बोलले जाते. भाजप आणि जेडीयू यांची आघाडी असली, तरी जेडीयूचे उमेदवार असलेल्या 122 जागांवरील भाजपच्या मतदारांची मते खेचण्यासाठी लोजप त्या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. हा प्लॅन यशस्वी ठरल्यास आघाडीमध्ये भाजप किंगमेकर ठरेल, आणि बिहारचे मुख्यमंत्रिपद काबीज करण्याची भाजप नेत्यांची महत्त्वाकांक्षाही पूर्ण होईल.

…तर महाराष्ट्राप्रमाणे विरोधीपक्ष सत्तेत

बिहारमधील स्थिती ही महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व युती-आघाडीप्रमाणे पाहिली जाते. शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करुन सत्ता स्थापन केली. ज्याप्रमाणे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द न पाळल्याच्या कारणावरुन शिवसेनेने युती तोडली, त्याप्रमाणे नितीशकुमारही एनडीएतून बाहेर पडून महागठबंधनमध्ये सामील होऊ शकतात. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 100 हून कमी जागा ‘महागठबंधन’च्या वाट्याला येतील, असा राजकीय विश्लेषकांचा कयास आहे. मात्र नितीशकुमार यांनी भाजपशी आघाडी तोडली, तर महागठबंधनचं पारडं जड होऊ शकतं. पर्यायाने भाजप पुन्हा सत्तेबाहेर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (BJP plans to stop Nitishkumar in Bihar Vidhansabha Election might turn into Maha Vikas Aghadi like Situation otherwise)

हा सर्व जर-तरचा खेळ आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काय होणार, जास्त जागा जिंकल्यास भाजप मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणणार का, चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यास उत्सुक असलेले नितीशकुमार भाजपने दबाव टाकल्यास महागठबंधनला जवळ करणार का, हे चित्र 10 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या :

एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

(BJP plans to stop Nitishkumar in Bihar Vidhansabha Election might turn into Maha Vikas Aghadi like Situation otherwise)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.