कौनसी हस्तियाँ कब डूब जाएंगी, शिवसेनेला लवकरच कळेल : भाजप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Sindhudurg) यांनी कालच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान शिवसेनेवर प्रहार केला.

कौनसी हस्तियाँ कब डूब जाएंगी, शिवसेनेला लवकरच कळेल : भाजप
प्रसाद लाड
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:14 PM

रत्नागिरी : “कौनसी हस्तीया कब डूब जाएंगी’ हे शिवसेनेला (Shiv Sena) 2022 ते 2024 या काळात नक्की कळेल, भारतीय जनता पार्टीकडून (BJP) जे सांगितलं ते सत्य होतं. भारतीय जनता पार्टीचे शिरस्व नेतृत्व कधी खोटं बोललेलं नाही. या महाराष्ट्रातील जनतेला कोण खोटं बोललं हे माहिती आहे. ज्यांनी हिंदुत्व विकलं त्यांनी आम्हाला हस्तिया आणि नेतृत्वाबद्दल शिकवू नये”, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (BJP Prasad Lad) यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.  (BJP Prasad Lad attack on Shiv Sena after Amit Shah Sindhudurg rally)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Sindhudurg) यांनी कालच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान शिवसेनेवर प्रहार केला. त्यानंतर आता याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फटकारलं.

इतकंच नाही तर प्रसाद लाड यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या पवित्र खोलीत झालेल्या चर्चेबद्दल आम्ही कधीच खोटं बोलणार नाही, असं म्हणाऱ्या शिवसेना नेते अरविंद सावंत यांनाही उत्तर दिलं. “बाळासाहेब ठाकरेंनी ज्या खोलीत बसून कायम काँग्रेसला विरोध केला, शरद पवार यांच्या नेतृत्वाला विरोध केला. त्याच खोलीत बसून त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गटबंधन करण्याचे काम शिवसेनेने केलं. भारतीय जनता पार्टीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत. त्यामुळे ज्या शिवसेनेनी बाळासाहेबांच्या रुममध्ये बसून स्वत:ची तत्वनिष्ठा, पक्ष संघटना, हिंदुत्व विकलं त्या अरविंद सावंत यांनी खोलीची गोष्ट करू नये” असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला.

अजित पवारांवर निशाणा

शिळ्या कढीला ऊत कशाला हे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, गेले वर्षभर ते महाराष्ट्रात आले नव्हते. सत्ता संर्घषानंतर एक वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यांच्या तोंडून याचे उत्तर द्यायला हवं होतं. त्यामुळे ज्यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा झाली असं बोललं होते. त्याबद्दल महाराष्ट्राच्या भूमीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत स्पष्ट केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

नवाब मलिकांचं विधान सूर्यावर थुंकण्यासारखं

नारायण राणेंप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी २२ वर्ष वाट पाहावी लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले होते. त्याला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं. “नवाब मलिकांचे हे वक्तव्य म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले.

VIDEO ;  प्रसाद लाड EXCLUSIVE

(BJP Prasad Lad attack on Shiv Sena after Amit Shah Sindhudurg rally)

संबंधित बातम्या:

नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे

अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.