भाजप ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत; नारायण राणेंकडे मोठी जबाबदारी

मुंबईत ठाकरे गटाला रोखण्यासाठी भाजपकडून रणनिती तयार करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजप ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत; नारायण राणेंकडे मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 9:27 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत (Shiv sena) फूट पडली. शिवसेनेत फूट पडल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घतेली. तेव्हापासून सातत्याने भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे गटाने देखील धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर आता भाजपाकडून उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपकडून त्यासाठी रणनिती आखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याची जबाबदारी भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

नारायण राणेंवर जबाबदारी

भाजपकडून सातत्याने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपकडून रनणिती तयार करण्यात आली आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी नारायण राणेंवर सोपवण्यात आली आहे. नारायण राणे हे तयारीला देखील लागले आहेत.  नारायण राणे यांचे आज मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही राणेंचे संघटनात्मक कार्यक्रम होणार आहेत. नारायण राणेंच्या मदतीने  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या चिन्हासह ठाकरे गटाची तयारी

दरम्यान दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर आता ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. नवं चिन्ह मिळताच ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच मशाल चिन्हाचे बॅनर लावल्याचं पहायला मिळालं होतं.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.