मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी माझा छळ केला, माझ्यासोबत अन्याय झाला (Chandrakant Patil Vs Eknath Khadse) म्हणून मी भाजप पक्ष सोडला, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे (Chandrakant Patil Vs Eknath Khadse).
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाषणादरम्यान खडसेंनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली. त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं ते म्हणाले. यावर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे. “एकनाथ खडसे यांनी ईडी लावण्याची वाट कशाला बघावी, आधी सीडी पब्लिश करावी”, असं थेट आव्हान त्यांनी खडसेंना दिलं. “खूप दिवसांपासून म्हणत आहेत माझ्याकडे खूप काही आहे. एकनाथ खडसे आता विरोधी पक्षात गेलेत, त्यामुळे त्यांनी काही बोलावं आणि आम्ही ते ऐकून घ्यावं अस आता होणार नाही, त्यांनी शब्द जपून वापरावेत”, अशी ताकीदही त्यांनी दिली. शिवाय, “खडसेंना त्यांची ताकद दाखवायला कुणी अडवलं आहे. त्यांना आव्हान देऊ देत आम्ही काही आव्हान देत नाहीत”, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीत खडसेंनी प्रवेश केला खरा, मात्र अद्याप त्यांना कुठलं पद दिलं जाणार आहे, पक्षात त्यांचं स्थान काय असणार आहे याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. यावरुन चंद्रकांत पाटलांनी खडसेंवर घणाघाती टीका केली. “एकनाथ खडसे यांना जर तिकडे काही मिळणार नव्हतं, तर मग चाळीस वर्षांसोबत असलेल्या पार्टीला का सोडलं. भाजपने तरी त्यांना सर्व दिलं”, असं ते म्हणाले.
फडणवीसांनी मला छळलं, फडणवीसांमुळे मी भाजप सोडली, असं खडसेंनी वारंवार बोलून दाखवलं. मात्र, “एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करु नये”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
खडसेंसोबत 10 ते 15 आमदार जाणार होते. मात्र, आज फक्त त्यांचे कुटुंबीय दिसले आणि भविष्य कुणी पाहिलं, असं म्हणत त्यांनी खडसेंवर निशाणा साधला. तसेच, अजित पवार खडसेंच्या पक्ष प्रवेशावर नाराज आहेत की नाही ते मला माहित नाही, मी एवढा मोठा राजकारणी नाही, असंही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेनंतर खडसेंनीही त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं. “टीव्ही 9” मराठीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील भाजपाचे नाहीत ते विधार्थी सेनेचे आहेत असं ते म्हणाले. इतकंच नाही तर “योग्य वेळी सीडी, ईडी बाहेर येईल”, असंही ते म्हणाले (Chandrakant Patil Vs Eknath Khadse).
खडसेंना आता कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, या पाटील यांच्या टीकेचा खडसेंनी समाचार घेतला. चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात, अशी टीका खडसे यांनी केली.
भाजपने खडसेंना सर्व दिलं, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. “भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं”, अशी टीका त्यांनी केली. त्याशिवाय, “कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का?”, असा सवालही त्यांनी केला.
“भाजपमध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझा भूखंडाशी काहीही संबंध नसताना माझी चौकशी करण्यात आली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराचे कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी करणार. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पुराव्याशिवाय मी कोणतेही आरोप केले नाहीत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Chandrakant Patil | राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी हे पाहावं लागेल : चंद्रकांत पाटीलhttps://t.co/FvgEjrF6L5@ChDadaPatil @EknathGKhadse @Dev_Fadnavis @NCPspeaks @Jayant_R_Patil #EknathKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2020
Chandrakant Patil Vs Eknath Khadse
संबंधित बातम्या :
जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो : एकनाथ खडसे
Jayant Patil | ताकद काय असते हे दाखवायला जळगावमध्ये जावं लागेल : जयंत पाटील
‘काना मागून आला आणि तिखट झाला’; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका