मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक (Legislative Council Elections) भाजपचं (BJP) जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. “आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली आहे. भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी जात आहे”, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.
“आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली आहे. भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी जात आहे”, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विधान परिषदेची निवडणूक होतेय. यात मदतान करण्यासाठी मुक्ता टिळक पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या आहेत.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे थोड्याच वेळात मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहे. विधान परिषदेसाठी एक-एक मत महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मतांची जुळवाजुळव केली आहे. आपले सगळे आमदार मतदानासाठी हजर राहतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.
नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. राज्यसभेच्या मतदानावेळी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप आजारी असतानादेखील ते हजर होते. याची खूप चर्चा झाली.
सर्वच राजकीय पक्षांसाठी आज सोनियाचा दिनू आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यसभा निवडणुकीमनंतर आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. अश्यात कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा आहेत.