अहमदगर : भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा, बारावी परीक्षांच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याशिवाच विखे पाटील यांनी काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यावरील निशाणा साधलाय. नवाब मलिक यांचं एवढ्या गंभीर प्रकारणात नाव आल्यावर बडतर्फ नव्हे तर हकालपट्टी केली पाहिजे होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अनिल देशमुखांवर लगेच कारवाई केली जाते आणि यांना पाठिशी घालण्याचे कारण काय ?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सरकार मध्ये जनाची नाही पण मनाची लाज असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. काँग्रेस मंत्री भ्रष्टाचारात अडकल्यानं ते सरकारमधून बाहेर पडत नाहीत, असं विखे पाटील म्हणाले.
बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो जळाला की जाळला चौकशी करायला पाहिजे. सरकार अगोदरच भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहे. एकही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडत नाही. कोव्हिड काळात शिक्षण विभागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच प्रश्नपत्रिका असलेल्या टेम्पोला आग लागलीय. सदर जळीत प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
काँग्रेसने स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकार मधून बाहेर पडलं पाहिजे. काँग्रेसचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकलेले असल्यानं ते बाहेर पडत नाहीत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल याच मूळे ते सत्तेत. काँग्रेसच्या भविष्याची कोणालाच चिंता राहिली नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आधार नसलेली बेताल वक्तव्य करण्याच काम संजय राऊत करत आहेत. सततच्या चौकशीमुळे राऊत अडचणीत आले आहेत. उद्या आपल्यावर कारवाई होईल या भीतीने संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत.
इतर बातम्या:
कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल
BJP Radhakrishna Vikhe Patil slam MVA Government over Nawab Malik Resignation