मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार (Bhagwat Karad BJP Rajya sabha candidate) यादी जाहीर केली आहे. त्याआधी पहिल्या यादीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यानंतर आज भाजपने दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने संजय काकडे यांचा पत्ता कट केल्याचं दिसून येत आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही तिकीट दिलेलं नाही. (Bhagwat Karad BJP Rajya sabha candidate)
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.
Bharatiya Janata Party releases a list of candidates for the upcoming Rajya Sabha elections. pic.twitter.com/dLimYCwXBz
— ANI (@ANI) March 12, 2020
भागवत कराड कोण आहेत?
डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार
भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.
उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे 26 मार्चला राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेसचा तिढा सुटला
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान ‘वेट अँड वॉच’वर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने फौजिया खानही आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. (Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav)
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
26 मार्चला निवडणूक
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (शुक्रवार 13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार