कोरोना काळात मोठ्या पॅकेजचे आश्वासन, दिवाळीत पूर्तता करा, राम कदमांचा टोला

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे.  (Ram Kadam Letter to CM Uddhav thackeray)

कोरोना काळात मोठ्या पॅकेजचे आश्वासन, दिवाळीत पूर्तता करा, राम कदमांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 4:04 PM

मुंबई : राज्यातील पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या सर्व कोरोना योद्धांना दिवाळीत दुप्पट बोनस द्यावा. तसेच कोरोना संकट गेल्यावर या योद्धांना आळीपाळीने वाढीव भरपगारी रजा द्यावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे.  (Ram Kadam Letter to CM Uddhav thackeray)

राज्यातील पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स आणि डॉक्टरांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. मात्र तरीही त्यांना पगार कपातीला सामोरे जावं लागलं. त्यामुळे बांधिलकीच्या भावनेतून सर्व कोरोना योद्धांना दिवाळीत दुप्पट बोनस द्यावा, असे राम कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच सरकार म्हणून आपण कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही एका पैशाची मदत केली नाही. मोठं पॅकेज देईन, असं आपलं आश्वासन होतं. तेही दिवाळीत आपण पूर्ण करावे, असा टोलाही राम कदम यांनी या पत्राद्वारे लगावला आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र

“गेल्या सात महिन्यात महाराष्ट्रातील सर्व पोलीस तसेच आरोग्य कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी-अधिकारी वर्ग यांनी स्वत: च्या जीवाची चिंता न करता रात्रंदिवस जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली.”

“हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यांच्या त्यागाचे आणि सेवेचे मोल खूप मोठे आहे. त्यातच आपण कोरोना काळात पोलिसांचा पगारही कापलात. तेही त्यांनी नम्रपणे सहन केले. अनेकांनी सेवा करता करता प्राणही गमावले.”

“आपण बांधिलकीच्या भावनेतून सर्व कोरोना योद्धांना दिवाळीत दुप्पट बोनस द्यावा. तसेच कोरोना संकट गेल्यावर आळीपाळीने वाढीव भरपगारी रजा द्यावी. जेणेकरुन त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ देता येईल. कोरोनादरम्यान त्यांनी लक्षणीय वेळ समाजासाठी दिला आहे, हे नाकारता येणार नाही. सरकार म्हणून आपण कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही एका पैशाची मदत केली नाही. मोठं पॅकेज देईन, असं आपलं आश्वासन होतं. तेही दिवाळीत आपण पूर्ण करावे,” असे राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

त्यामुळे राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रावर ते काय उत्तर देतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ते कोरोना योद्धांसाठी बोनस जाहीर करतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ram Kadam Letter to CM Uddhav thackeray)

संबंधित बातम्या : 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने होणार साजरा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.