नेत्यांची गुपितं अन् वसुलीच्या कहाण्या उघड करा, नार्को टेस्ट करा, भाजपच्या ‘या’ नेत्याची मागणी
महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्तेत आल्यापासून लहान-मोठ्या हॉटेलवाल्यांपासून काँट्रॅक्टरपर्यंत तसेच सरकारी नोकरांच्या बदल्यांमध्ये किती कोटी रुपये घ्यायचे, याची लीस्टच बनवली होती, असा आरोप करण्यात आलाय.
मुंबईः वेदांता (Vedanta Foxconn) तसेच टाटा एअरबसचा (Tata Airbus) प्रकल्प गुजरातला का गेला, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमुळे गेला की एकनाथ शिंदे-भाजप सरकारमुळे गेला, या प्रश्नाचं उत्तर जनतेला पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी केली आहे. मविआचे नेते खरच प्रामाणिक असतील तर त्यांनी या तपासणीला सामोरं जावं, कर नाही त्याला डर कशाला, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. राम कदम यांनी यासंदर्भात सविस्तर ट्विट केलंय. तसेच टीव्ही9 शी बोलताना स्पष्ट भूमिकादेखील मांडली.
राम कदम म्हणाले, ‘ तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात धादांत खोटं बोलले. आम्ही त्यावेळी सभा घेऊन धरणं आंदोलन केलं. अधिकारी आले. कागदपत्र दाखवा, असं म्हणाले. यासंबंधी कोणताही एमओयू नव्हता. जागा फायनल केली तर तो प्रकल्प गुजरात कशाला जाईल?
नार्कोटेस्टने सर्व गुपित आणी वसुलीच्या कहाण्या समोर लयेतील.
सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्या पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंत,आणी बदल्यामध्ये किती करोड रुपये घायचे.ह्याची लिस्टच बनवली होती. ज्यांनी वाझे पासून अधिकाऱ्यांना वसुली वसुली खेळात जुपले होते. पोलिसांना
— Ram Kadam (@ramkadam) October 29, 2022
तुमची मीटिंग कोणत्या हॉटेलमध्ये झाली होती? तिथं कोण उपस्थित होतं? ते अधिकारी, प्रमुख लोक मागच्या सरकारच्या काही नेत्यांशी संपर्क करत होते. तुम्ही तेव्हा का टाळाटाळ केली? तुम्ही त्यांना किती कोटी रुपयांचं कमिशन मागितलं? हे सगळे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं समोर आलीच पाहिजेत, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्तेत आल्यापासून लहान-मोठ्या हॉटेलवाल्यांपासून काँट्रॅक्टरपर्यंत तसेच सरकारी नोकरांच्या बदल्यांमध्ये किती कोटी रुपये घ्यायचे, याची लीस्टच बनवली होती. ज्यांनी वाझेपासून अधिकाऱ्यांना वसुली वसुली खेळात जुंपले होते. पोलिसांनाही सोडलं नव्हतं. तर मग कोट्यवधी रुपयांच्या प्रोजेक्टला कसं सोडतील, असा आरोप राम कदम यांनी केलाय.