Prataprao Jadhav : भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला, बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरही प्रतापराव जाधवांचे स्पष्टीकरण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी जरी एकला चलो च्या नाऱ्याप्रमाणेच बुलढाण्यात खासदारही आमचा आणि सात आमदारही भाजपचेच असे सांगितले तरी जागा वाटपाचा एक फार्म्युला ठरल्याचे खा. प्रताराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात शिंदे गट आणि भाजप हे एकत्र तर निवडणुका लढवतीलच पण यामध्ये 60:40 हा जागा वाटपाचा फार्म्युला असणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Prataprao Jadhav : भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला, बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरही प्रतापराव जाधवांचे स्पष्टीकरण
खा. प्रतापराव जाधव
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 6:10 PM

बुलढाणा : प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष संघटन आणि मजबूतीकरणाच्या कामाला लागले होते. दरम्यान, (Buldhana) बुलाढाण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेले एक विधान अजूनही शिंदे गटाचे खासदार आणि आमदार हे विसरलेले नाहीत. जिल्ह्याचा खासदार भाजपचा आणि सातही विधानसभा मतदार संघात कमळच फुलेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे शिंदे गटाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर शिंदे गटानेही आक्षेप घेत यापुढे अशी विधाने सहन केली जाणार नसल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर आता 15 दिवसानंतरही त्यावर शिंदे गटाला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. बावनकुळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी हे विधान केले होते. तर आगामी काळात भाजप आणि शिंदे गटाचा नियुक्त्यांमध्ये 60:40 असाच फॉर्म्युला असेल हे (Prataprao Jadhav) खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे. बावनकुळे यांच्या त्या वक्तव्याने प्रताराव जाधव यांचा देखील पत्ता कट होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळेच त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

कसा असणार भाजप-शिंदे गटाचा फार्म्युला?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी जरी एकला चलो च्या नाऱ्याप्रमाणेच बुलढाण्यात खासदारही आमचा आणि सात आमदारही भाजपचेच असे सांगितले तरी जागा वाटपाचा एक फार्म्युला ठरल्याचे खा. प्रताराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात शिंदे गट आणि भाजप हे एकत्र तर निवडणुका लढवतीलच पण नियुक्त्यांमध्ये 60:40 हाच फार्म्युला असणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मध्यंतरी बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रमतेचे वातावरण झाले होते. एवढेच नाहीतर शिंदे गटाला पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडावी लागली होती.

कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठीचे विधान

बुलढाणा येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील खासदार आणि विधानसभेच्या सातही जागांवर भाजपचाच आमदार राहणार. यासाठी तयारीला लागा अशा सूचना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. असे झाले तर शिंदे गटाचे काय असा सवाल उपस्थित झाला होता. यावर आता सावरासावर करीत त्यांनी ते विधान केवळ उपस्थित कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी केल्याचे खा. जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपाची आगामी काळातील रणनिती काय असा सवालही उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

‘त्या’ वक्तव्यावरुन तर्क-वितर्क

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पक्ष संघटनेसाठी दौरे सुरु केले होते. दरम्यान, दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडताना केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच पेटले होते. भाजप आणि शिंदे गटातही एकसुत्रीपणा नाहीच असेच त्यांचे विधान होते. तर सर्व जागांवर भाजपाचे आमदार तर शिंदे गटाचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे सध्याचे सरकार हे देखील तात्पुरते असून भाजपाची धोरणे ही वेगळीच असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आता जाधवांनी स्पष्टीकरण देऊन सर्वकाही अलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....