घटस्थापनेदिवशी युतीची घोषणा, फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 29 सप्टेंबरला युतीची (BJP-shivsena alliance assembly election) घोषणा करण्याची शक्यता आहे.

घटस्थापनेदिवशी युतीची घोषणा, फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात!
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 11:29 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या तरी भाजप आणि शिवसेनेची भाषा युती (BJP-shivsena alliance) होणार अशीच आहे. मात्र या फॉर्म्युल्याबद्दल जाहीरपणे दोन्ही पक्षांचे नेते बोलायला तयार नाहीत. आता पितृपक्षानंतरच युतीची घोषणा होणार असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 29 सप्टेंबरला युतीची (BJP-shivsena alliance assembly election) घोषणा करण्याची शक्यता आहे. याच वेळी विधानसभेचा फॉर्म्युलाही (BJP-shivsena alliance assembly election) ठरणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेचा फॉर्म्युला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ठरवणार आहेत. हा फॉर्म्युला मुंबईत ठरणार आहे.

राज्यात निवडणुकाची घोषणा झाल्यानंतर युतीची घोषणा (BJP-shivsena alliance) अद्याप झालेली नाही. ही घोषणा पितृपक्षानंतर होणार असल्याची माहिती भाजपच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे. येत्या 29 सप्टेंबरला घटस्थापना म्हणजेच नवरात्रीचा मुहूर्त साधून युतीची घोषणा होईल, असे भाजपातील अनेक दिग्गज नेते सांगत आहे.

दरम्यान युतीच्या घोषणेबाबत सध्या पितृपक्षाचं कारण असलं, तरीही युतीचे घोडं हे जागा वाटपावर (BJP-shivsena alliance for Assembly election) अडकलेलं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युलावर अडून बसली आहे. तर भाजप 126 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला (BJP-shivsena alliance for Assembly election) द्यायला तयार नाही. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आता अमित शाह युतीचा निकाल लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या 29 तारखेला अमित शाह (Amit shah) मुंबईत येणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच (BJP-shivsena alliance for Assembly election) आता जागा वाटपाचा फॉर्म्युला शाहाचं निश्चित करण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान शिवसेना भाजप युती होणार हे दोन्ही पक्ष ठामपणे सांगत आहेत. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युलाचं कोडं सोडवण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे. या फॉर्म्युल्याच्या कोड्यावरचं युतीचं भवितव्यही अवलंबून असल्याचे पाहायला मिळत आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.