भाजप-शिवसेना नेत्यांचं एकमेकांना ‘तिळगूळ घ्या, गोडगोड बोला’
मुंबई : भाजपने शिवसेनेला तिळगूळ देऊन गोडगोड बोलण्याची विनंती केली. यावर शिवसेनेनेही उत्तर देत, आमच्याशी भांडू नका, अशी विनंती केली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत भाजप-शिवसेना नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन युतीच्या नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळाचं वाटप केलं. युतीमधील कटुता संपवून संबंध सुधारण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी शिवसेना मंत्र्यांना तिळगूळ दिला. तिळगूळ […]
मुंबई : भाजपने शिवसेनेला तिळगूळ देऊन गोडगोड बोलण्याची विनंती केली. यावर शिवसेनेनेही उत्तर देत, आमच्याशी भांडू नका, अशी विनंती केली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत भाजप-शिवसेना नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन युतीच्या नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळाचं वाटप केलं.
युतीमधील कटुता संपवून संबंध सुधारण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी शिवसेना मंत्र्यांना तिळगूळ दिला. तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर रामदास कदमांनीही उत्तर दिलं. आमच्याशी फक्त भांडू नका, असा चिमटा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काढला.
लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. विरोधकांनी एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. तर शिवसेना आणि भाजपचीही युतीसाठी चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय. पण शिवसेना भाजपवर आणि भाजप शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाही. शिवसेना मंत्री सरकारमध्ये असूनही भाजपवर बोलताना दिसतात.
एका सरकारमध्ये असूनही एकमेकांवर आरोप करणं आणि टीका करणं ही भांडणं संपवण्यासाठी तिळगूळ काम करण्याची शक्यता आहे. कारण, आगामी निवडणुकीच्या तोंडावर युतीच्या सकारात्मक चर्चेसाठी भाजपने पुढाकार घेतलाय. दोन दिवासांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की युतीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरु आहे.