BJP : विधानसभा प्रचारासाठी भाजपची स्टारकास्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात, तडका लावणारे लाडके कवी यादीत काही दिसेनात, जास्त फाटलं की काय?

BJP Star Campaigners : राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. ऐन दिवाळीत आता एकमेकांविरोधात फटाके फुटणार आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 जणांचा समावेश आहे. पण या यादीत देशाच्या लाडक्या कवीचे नाव काही दिसत नाही.

BJP : विधानसभा प्रचारासाठी भाजपची स्टारकास्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात, तडका लावणारे लाडके कवी यादीत काही दिसेनात, जास्त फाटलं की काय?
भाजपच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 9:24 AM

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागांचा घोळ जवळपास संपण्यात जमा आहे. ऐन दिवाळीत निवडणूक लागल्याने शा‍ब्दिक बॉम्ब, फटक्यांची लड लागणार आहे. आरोपांच्या फुलझड्या फेटणार आहेत. तर टीकेचे रॉकेट सुटणार आहे. अनेक नेते शब्द बंबाळ होणार आहेत. अनेकांना या फटक्यांचे चटके सहन करावे लागणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या टिकल्याच नाहीत तर सुतळी बॉम्ब राज्यातील जनतेचे मनोरंजन करणार आहे. यंदा दिवाळीत टीव्हीवरील रंगारंग कार्यक्रमापेक्षा सभांमधील शा‍ब्दिक हल्ले अधिक भाव खाऊन जातील. त्यामुळेच अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 40 जणांची मोठी टीम प्रचाराची धूरा सांभाळणार आहेत. पण या यादीत जीवाभावाचे मित्र आणि लाडके कवींचे नाव न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

गेल्या लोकसभेत भाजपाने अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. पण विधानसभेसाठी अद्याप भाजपने कोणताही नारा रेटला नाही. प्रचाराला अजून सुरूवात झालेली नाही. प्रचाराचा नारळ फुटल्यावर लागलीच मुद्दे आणि नारे जनतेच्या पुढ्यात येतील. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. कोण कोण आहेत या स्टार प्रचारक यादीत?

हे सुद्धा वाचा

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

1) देवेंद्र फडणवीस

2) विनोद तावडे

3) चंद्रशेखर बावनकुळे

4) रावसाहेब दानवे

5) अशोक चव्हाण

6) उदयनराजे भोसले

7) नारायण राणे

8) पंकजा मुंडे

9) चंद्रकांत दादा पाटील

10) आशिष शेलार

11) सुधीर मुनगंटीवार

12) राधाकृष्ण विखे पाटील

13) गिरीश महाजन

14) रविंद्र चव्हाण

15) प्रवीण दरेकर

16) अमर साबळे

17) मुरलीधर मोहळ

18) अशोक नेते

19) डॉ. संजय कुटे

20) नवनीत राणा

मित्र पक्षाच्या एकाही नेत्याचा समावेश नाही

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्र पक्षांच्या काही नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आघाडीवर होते. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव पण होते. अर्थात ती लोकसभेसाठीची रणधुमाळी होती. या यादीत रामदास आठवले यांचे नाव नसल्याने चर्चेला पेव फुटले आहेत. त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याची नाराजी अगोदरच बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागांसाठी ते आग्रही होते. पण त्यांच्या पक्षाला जागा वाटपात स्थान देण्यात आले नाही. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात न आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.