मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे.
कोल्हापूर : “मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt)”, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सरकारवर केला आहे. “कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).
“मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी 642 कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
“गेले तीन महिने व्याज भरलेली परतावा बँकेच्या खात्यात झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे. ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत”, असंही ते म्हणाले.
यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता – अमोल मिटकरी
“चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला सिरीअसली घ्यायची गरज नाही. यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता आहेत. कोरोना सोडून यांना इतर मुद्दे सुचत आहेत. मागच्या पाच वर्षात तुम्ही घाबरले होते. म्हणून मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल झाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात आमचं सरकार सकारात्मक एनवेळी काहीतरी सोडायचं आणि दिशाभुल करायची ही पध्दत आहे”, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).
आधी आरक्षण, मगच भरती, संभाजीराजे छत्रपतींचा पवित्रा, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नकोhttps://t.co/YQGwGsYe5m #ChhatrapatiSambhajiRaje #MarathaReservation @YuvrajSambhaji
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2020
Chandrakant Patil Criticize Thackeray Govt
संबंधित बातम्या :
युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस