कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क लावल्यामुळे कदाचित त्यांना विरोधी पक्ष राजकारण करत आहे, असे वाटत असेल. पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल.
मुंबई : मुख्यमंत्र्यांना आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे (Chandrakant Patil Criticize Uddhav Thackeray), असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला (Chandrakant Patil Criticize Uddhav Thackeray).
“विरोधी पक्ष राजकारण करतंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. मग कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना! सुशांत सिंहच्या प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी जर योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास एजन्सीला काहीच करावे लागले नसते. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे”, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क लावल्यामुळे कदाचित त्यांना विरोधी पक्ष राजकारण करत आहे, असे वाटत असेल. पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल.
सुशांत सिंह प्रकरणात केंद्राच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत जी कारवाईकेली आहे तर त्याला राजकारण नाही, तर प्रशासकीय कार्यपद्धती म्हणतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही कोणालाच बाहेर जायला सांगितले नाही, फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा : संजय राऊतhttps://t.co/yEYTr3LjIy #SanjayRaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Chandrakant Patil Criticize Uddhav Thackeray
संबंधित बातम्या :
इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही,मग महाराष्ट्रातच का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
“तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा”, ‘ठाकरे ब्रॅण्ड’वरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल