राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड – चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.
मुंबई : Toolkit प्रकरणावरुन देशात सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रचार योजना आखल्याचं उघडकीस आलंय. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली. (Chandrakant Patil criticizes Congress over toolkit issue)
सोशल मीडियाच्या जगात ज्याला Toolkit म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेस गेली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केलीय.
काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना ‘या’ सूचना?
पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या Toolkit मध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुपर स्प्रेडर कुंभ असा नॅरेटीव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून तो आणखी वाढविण्यासाठी समविचारी आंतरराष्ट्रीय मीडिया व पत्रकारांशी हातमिळवणी करण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. ईदसाठी जमलेल्या गर्दीबाबत मात्र कोणतीही टिप्पणी करू नये, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचंही पाटील म्हणाले.
As India is battling #COVID19 , Congress party is busy in damaging the social fabric of our nation. Reading the toolkit, one can clearly understand that the sole aim of the Congress is to destroy India. Nationalist Indians will not let them succeed. #CongressToolkitExposed pic.twitter.com/G7MqaLRBzt
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 18, 2021
केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय.
‘सखोल तपास करून कारवाई करा’
काँग्रेसच्या Toolkit मधील धक्कादायक सूचनांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हटले जावे, अशी सूचना आहे. यासोबतच पीएम केअर फंडबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने संभ्रम निर्माण केला जावा आणि जर एखाद्या सेलिब्रिटीने यामध्ये दान केले तर त्यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यात यावे, असेही सांगण्यात आलंय. एकूणच हे Toolkit धक्कादायक आहे. त्याची निर्मिती आणि वापर या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करून कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर’ Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपवर पलटवार
नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर एफआयआर दाखल करा; काँग्रेसची दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी
Chandrakant Patil criticizes Congress over toolkit issue