Chandrakant Patil | राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी हे पाहावं लागेल : चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. मात्र, त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती.

Chandrakant Patil | राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी हे पाहावं लागेल : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 5:16 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात (Chandrakant Patil First Reaction On Eknath Khadse Joining NCP), याकडे आमचंही लक्ष असेल, अशी घोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केला. तसेच, भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. मात्र, त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवरही टिकास्त्र सोडलं (Chandrakant Patil First Reaction On Eknath Khadse Joining NCP).

चंद्रकांत पाटील नेकमं काय म्हणाले?

“नाथा भाऊंवर जो अन्याय झाला त्यावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाली. नाथा भाऊंना पक्षानेही खूप काही दिलं. त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यावर काही ना काही तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात ते बघुया”, असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली.

“2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी सांगावं. तुमच्याकडेही अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथा भाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही समाधान होतं. त्यामुळे आता त्यांना तो लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असं म्हणतात, हे पाहावं लागेल”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि खडसेंवर निशाणा साधला. तसेच, “एकट्या देवेंद्रजींना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात”, असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खडसेंनी पक्ष प्रवेश केला. तसेच, खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जयंत पाटलांची भाजपवर टीका

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही सुडाचं राजकारण झालं नाही. आपल्या राज्याची तशी संस्कृती नाही. शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Chandrakant Patil First Reaction On Eknath Khadse Joining NCP

संबंधित बातम्या :

जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो : एकनाथ खडसे

Jayant Patil | ताकद काय असते हे दाखवायला जळगावमध्ये जावं लागेल : जयंत पाटील

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.