Chandrakant Patil on Padalkar | पडळकरांची पवारांवर टीका, भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया काय?

गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाची हाक दिली आहे. (Chandrakant Patil on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Corona)

Chandrakant Patil on Padalkar | पडळकरांची पवारांवर टीका, भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 8:59 AM

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी मौन बाळगले आहे. “मी या विषयावर बोलणार नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती. (Chandrakant Patil on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Corona)

पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजप आपल्या नवनिर्वाचित आमदारावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मूळ बातमी वाचा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ, ऑडिओ क्लिप जमा करुन तपासण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

भाजपची भूमिका काय?

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तर शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आज (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे.

हेही वाचा : शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

“गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

पडळकर काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

संबंधित बातम्या :

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

(Chandrakant Patil on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Corona)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.