Pankaja Munde : भाजप प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या घरी, पक्ष संघटनेवर चर्चा, मुंडेंच्या नाराजीवर म्हणाले..

पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले गेले की, राज्यात एकच चर्चा असते ती म्हणजे पंकजा मुंडे ह्या नाराज आहेत. विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. पण येथेही डावलण्यात आले. त्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत वेगळा विचार करीत असल्याचा आरोप सातत्याने कार्यकर्त्यांनी केलेला आहे.

Pankaja Munde : भाजप प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या घरी, पक्ष संघटनेवर चर्चा, मुंडेंच्या नाराजीवर म्हणाले..
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंजे यांची घरी जाऊन भेट घेतलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 7:59 PM

मुंबई : (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून पक्ष संघटनेबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये (BJP Party) भाजपच कसा सरस राहिल याचे ते नियोजन करीत आहेत. त्यासाठी आवश्यक आहे ते पक्ष संघटन, त्याअनुशंगानेच चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर दौरा करीत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आतापासूनच लोकसभेची गणिते मांडत आहेत. हे सर्व होत असतानाच त्यांनी (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांची घरी जाऊन भेट घेतली. एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट यामध्ये नाविन्य असे काहीच नाही पण गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पक्षाकडून वेळोवेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोपही राहिलेला आहे. या दरम्यानच प्रदेशाध्यक्ष थेट घरी जाऊन भेटले म्हणजे राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच. पण त्या नाराज नाहीत आणि यापूर्वीही नव्हत्या, एवढेच नाहीतर त्यांनी आता भाजपासाठी पूर्ण वेळ काम कऱण्याचे आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

मुंडेंच्या नाराजी बद्दल काय म्हणाले बावनकुळे?

पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले गेले की, राज्यात एकच चर्चा असते ती म्हणजे पंकजा मुंडे ह्या नाराज आहेत. विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. पण येथेही डावलण्यात आले. त्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत वेगळा विचार करीत असल्याचा आरोप सातत्याने कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मात्र, पंकजा मुंडे ह्या पक्षावर कधीही नाराज नव्हत्या, तशा कल्पक बातम्या पेरल्या जात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तर त्या आता संपूर्ण वेळ पक्षाचे काम करणार असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

पक्ष संघटन आणि निवडणुकीवर भर

प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी बावनकुळे यांच्या खांद्यावर आल्यापासून त्यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. या दरम्यानच्या काळात पक्षाचे संघटन आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुका हेच त्यांचे ध्येय राहणार आहे. त्याअनुशंगानेच पंकजा मुंडे यांची त्यांनी भेट घेतली असून या बैठकीमध्येही आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटन यावरच चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीत खा. प्रीतम मुंडेचीही उपस्थिती

गेल्या काही दिवसांपासून पक्षा पासून दुरावलेल्या पंकजा मुंडे यांच्या भेटीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गेले होते. आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये पंकजा मिुंडे यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे म्हणून बावनकुळे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खा. प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. बावनकुळे यांनी स्वत:ची बाजून मांडली पण पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे अधिकचे सांगितले नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.