“सत्यजित तांबे यांनी पंतप्रधानांचा केलेला अपमान भाजप विसरणार नाही”; भाजप नेत्यानं तांबेंचा भाजप प्रवेश उडवून लावला
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे भाजप-काँग्रेसचा सामना रंगला असल्याचे साऱ्या राज्याने पाहिले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतूक केल्यामुळे या प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
पुणेः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसच्या सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे या पितापुत्रामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतूक करत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीविषयी विचार करू असा आशावाद देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केला.
तर दुसरीकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मात्र सत्यजित तांबे यांच्या सत्यजित तांबे यांना भाजपनं पाठिंबा देऊ नये, संजय काकडे यांनी विरोध दर्शविला आहे.
सत्यजित तांबे यांना विरोध करत त्यांनी सत्यजित तांबे यांनी भाजपवर केलेली टीका, आंदोलनांची आठवण करून देत तांबे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेली वक्तव्य भाजप आयुष्यभर विसरणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसह त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेली वक्तव्य आणि आंदोलनं आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सत्यजित तांबे यांनी केलेली आंदोलने आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटो फासलेली काळे भाजप कधीही विसरणार नाही त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे.
सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशबद्दल चर्चा चालू असल्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली चाणक्यनीती भाजपच्या पत्त्यावर पडली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नाशिकमध्ये काँग्रेसला ब्रेक लावण्यात आम्हाला यश आले आहे असंही संजय काकडे यांनी सांगितले आहे.
सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असले तरी त्यांनी भाजपविरोधात केलेले आंदोलन आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेली शाईफेक आंदोलनामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे भाजप-काँग्रेसचा सामना रंगला असल्याचे साऱ्या राज्याने पाहिले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतूक केल्यामुळे या प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
तर दुसरीकडे संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही चाणक्यनीती असल्याचे सांगत नाशिक पदवीधर मतदार संघात आम्हाला काँग्रेसला ब्रेक लावता आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आता सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसनी केलेली कारवाई आणि भाजपमध्ये प्रवेश देऊ नये म्हणून केली जाणाऱ्या प्रयत्नात आता नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.