रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊतांना भाजपचा जोरदार विरोध
सिंधुदुर्ग : कोकणातले शिवसेनेचे खासदार आणि संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांची अडचण संपता संपेना. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतही विनायक राऊत यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात भाजपच्या सुरेश प्रभूंना उमेदवारी देण्याची मागणी केली. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार […]
सिंधुदुर्ग : कोकणातले शिवसेनेचे खासदार आणि संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांची अडचण संपता संपेना. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतही विनायक राऊत यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात भाजपच्या सुरेश प्रभूंना उमेदवारी देण्याची मागणी केली. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाडही उपस्थित होते.
युती झाल्यामुळे शिवसेना आणि भाजपचा मार्ग सुकर झाला असला तरी विविध ठिकाणी गटबाजीचं ग्रहण लागलं आहे. नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रमोद जठार यांचा राजीनामा मंजूर झाला नाही.
बॅरिस्टर नाथ पै, मुधुदंडवते अशा दिग्गजांचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघ. गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील लोकसभा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच शिवसेनेचे, तर एक काँग्रेसचा आमदार आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 57.40 टक्के, 2014 ला 65.86 टक्के मतदान झालं होतं.
2014 च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी धक्कादायक आहे. 2014 मध्ये शिवसेनेकडून शिवसेना सचिव विनायक राऊत यांना उमेदवरी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली. विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मते पडली. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या निलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मते मिळाली. दीड लाखांहून अधिकच्या मतांनी विनायक राऊत निवडून आले.
व्हिडीओ पाहा