असंवेदनशील महाभकासआघाडी सरकारचा धिक्कार, भाजपची टीका, सलग चार ट्वीट

आता सर्वांनी एकजूट होऊन यांनाच दणका देऊया ! असा फोटो भाजपने ट्वीट केला आहे. (BJP Tweet Criticizes Maha Vikas aaghadi government on Electricity Bill)  

असंवेदनशील महाभकासआघाडी सरकारचा धिक्कार, भाजपची टीका, सलग चार ट्वीट
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 2:30 PM

मुंबई : “राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया,” असा नारा भाजपने दिला आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलाची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपने चार ट्वीट करत महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. (BJP Tweet Criticizes Maha Vikas aaghadi government on Electricity Bill)

कर्जमाफीच्या आणि वीजबिल सवलतीच्या केवळ घोषणाच केल्या. प्रत्यक्षात जनतेसह बळीराजालाही लुबाडणाऱ्यांचं हे सरकार आहे. आता सर्वांनी एकजूट होऊन यांनाच दणका देऊया ! वीज वापरली तर आता बिलं भरा असं म्हणणाऱ्या असंवेदनशील महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो ! असे चार फोटो भाजपने ट्वीट केले आहेत.

राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया. वाढीव वीजबिलासंदर्भात सवलत देऊ, अशी वारंवार घोषणा करुन युटर्न घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असेही दोन ट्वीट भाजपने केले आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक झळ सोसणाऱ्या जनतेला भरमसाट वीज बिलाचे झटके देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी टीकाही भाजपने केली आहे.  #महाआघाडीवीजघोटाळा #MVAPowerScam असा हॅशटॅगही भाजपने वापरला आहे.

भाजपचे सलग चार ट्वीट

दरम्यान वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात आज आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलाची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी झाले आहेत. (BJP Tweet Criticizes Maha Vikas aaghadi government on Electricity Bill)

संबंधित बातम्या : 

BJP Protest | कल्याणमध्ये भाजपच्या वीज बिलाची होळी, पोलीस आणि आमदारांमध्ये जोरदार झटापट

BJP Protest for Electricity Bill Relief | वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.