मुंबई : “राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया,” असा नारा भाजपने दिला आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलाची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपने चार ट्वीट करत महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. (BJP Tweet Criticizes Maha Vikas aaghadi government on Electricity Bill)
कर्जमाफीच्या आणि वीजबिल सवलतीच्या केवळ घोषणाच केल्या. प्रत्यक्षात जनतेसह बळीराजालाही लुबाडणाऱ्यांचं हे सरकार आहे. आता सर्वांनी एकजूट होऊन यांनाच दणका देऊया ! वीज वापरली तर आता बिलं भरा असं म्हणणाऱ्या असंवेदनशील महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो ! असे चार फोटो भाजपने ट्वीट केले आहेत.
राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया. वाढीव वीजबिलासंदर्भात सवलत देऊ, अशी वारंवार घोषणा करुन युटर्न घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असेही दोन ट्वीट भाजपने केले आहे.
कोरोनामुळे आधीच आर्थिक झळ सोसणाऱ्या जनतेला भरमसाट वीज बिलाचे झटके देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी टीकाही भाजपने केली आहे. #महाआघाडीवीजघोटाळा #MVAPowerScam असा हॅशटॅगही भाजपने वापरला आहे.
राज्यातील जनतेला आत्महत्येच्या दरीत लोटणाऱ्या सरकारचा निषेध !#महाआघाडीवीजघोटाळा#MVAPowerScam@ChDadaPatil @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/WL1r8ZacO9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 23, 2020
वीज वापरली तर आता बिलं भरा असं म्हणणाऱ्या असंवेदनशील महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो !#महाआघाडीवीजघोटाळा#MVAPowerScam@ChDadaPatil @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/XnB5Qjqcr5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 23, 2020
खोटी वाढीव वीजबिले पाठवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या महाभकास आघाडी सरकारचा निषेध !#महाआघाडीवीजघोटाळा#MVAPowerScam@ChDadaPatil @Dev_Fadnavis @cbawankule @mipravindarekar pic.twitter.com/SEiFL7YOQz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 23, 2020
दरम्यान वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात आज आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलाची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी झाले आहेत. (BJP Tweet Criticizes Maha Vikas aaghadi government on Electricity Bill)
संबंधित बातम्या :
BJP Protest | कल्याणमध्ये भाजपच्या वीज बिलाची होळी, पोलीस आणि आमदारांमध्ये जोरदार झटापट