कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला धक्का, मनसेची भाजपला साथ
कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विकास म्हात्रे निवडून आले (Kalyan dombivali bmc) आहेत.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विकास म्हात्रे निवडून आले (Kalyan dombivali bmc) आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत महाविकासआघाडीला देखील मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सुरुंग लावला (Kalyan dombivali bmc election) आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 25 वर्षातील जवळपास 22 वर्षाहून अधिक वर्षे सेना-भाजपची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सुद्धा केडीएमसीत मात्र युती कायम आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थायी समिती सभापती निवडणूक शुक्रवारी (3 जानेवारी) पार पडली. या निवडणुकीसाठी शिवसेनेसाठी गणेश कोट आणि भाजपकडून विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
निवडणुकीच्या आधी शिवसेनेचा पारडे जड असताना कॉंग्रेस आणि मनसेचे एक एक सदस्य काय भूमिका घेणार आहे याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी 8 सदस्य हे शिवसेनेचे आहेत. तर भाजपचे 6, मनसे 1 आणि काँग्रेसचा 1 असे सदस्य (Kalyan dombivali bmc election) आहेत.
शिवसेनेचा एक सदस्य वामन म्हात्रे गैरहजर राहिल्यानं या निवडणुकीला कलाटणी मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे 7 आणि भाजपचे 6 सदस्य होते. काँग्रेसची एक नगरसेविका हर्षदा भोईर आणि मनसेची नगरसेविका सरोज भोईर या दोन सदस्यांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे विकास म्हात्रे हे निवडून आले. यावेळी विकास म्हात्रे यांनी विकास कामावर भर देणार असल्याचे सांगितले.
भाजपच्या यशामागे डोंबिवलीचे आमदार माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची खेळी आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात रवींद्र चव्हाण यांनी सुरुंग लावला आहे. आतापर्यंत ठाणेकरांनी जे काही आश्वासन दिले ते पाळले गेले नाही. सत्तेत आल्यानंतर ठाणेकरांनी आम्हाला टाळले, असा टोला रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
आमचा एक सदस्य वामन म्हात्रे गैरहजर राहिल्याने आम्ही ही निवडणूक हरलो अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी दिली (Kalyan dombivali bmc election) आहे.
परिस्थितीनुसार निर्णय घेतला गेला आहे. नवीन राजकीय समीकरणाची हि नांदी असू शकते. भाजपला साथ देणाऱ्या मनसेच्या गटनेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली.