शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

बिहारमध्ये 'एनडीए'चा विजय झाल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. | Sanjay Raut

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:15 PM

मुंबई: बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला (JDU) कमी जागा मिळाल्या तरी भाजप नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद देईल. शब्द फिरवल्यावर काय उलथापालथ होऊ शकते, हे महाराष्ट्राने भाजपला दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना दिलेला शब्द फिरवणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. (Shivsena shows BJP what will be the consequences if they break promises says Sanjay Raut)

बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहारचा निकाल काही लागला तरी ‘मॅन ऑफ द मॅच’ हे तेजस्वी यादव हेच असतील. भाजपची केंद्रीय यंत्रणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही अवघ्या 30 वर्षांच्या तेजस्वी यादव यांनी सगळ्यांच्या तोंडाला फेस आणला, असे राऊत यांनी सांगितले.

तसेच बिहारमध्ये ‘एनडीए’चा विजय झाल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, असा दावाही राऊत यांनी केला. महाराष्ट्रात भाजपने दिलेला शब्द फिरवल्यानंतर उलथापालथ झाली. शिवसेनेने अनपेक्षित भूमिका घेतली. त्यामुळे शब्द फिरवल्यास काय परिणाम होऊ शकतात, हे महाराष्ट्राने भाजपला दाखवून दिले आहे. त्यामुळे आता भाजप नितीश कुमार यांना दिलेला शब्द फिरवणार नाही. संयुक्त जनता दलाच्या कमी जागा येऊनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर त्यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस बिहारचे निवडणूक प्रमुख होते. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही त्यांचे आभार नक्की मानू. जिंकल्यानंतर प्रतिस्पर्ध्याचे आभार मानणे ही शिवसेनेची संस्कृती आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या संथ मतमोजणीमुळे सध्या राज्यातील चित्र दोलायमान आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी एनडीए 131 जागांवर आघाडीवर आहे. तर महागठबंधन 102 जागांवर आघाडीवर आहे. भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर असली तरी ही परिस्थिती किती काळ टिकेल, हे कोणत्याच राजकीय तज्ज्ञाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सध्या वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

(Shivsena shows BJP what will be the consequences if they break promieses says Sanjay Raut)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.