नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, देवेंद्र फडणवीसांकडून आंदोलनाची घोषणा

| Updated on: Mar 04, 2022 | 9:58 PM

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, देवेंद्र फडणवीसांकडून आंदोलनाची घोषणा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित जमीन व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे अडचणीत आले आहेत. मलिक सध्या अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडी कोठडीत आहेत. अशावेळी मुंबईत बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय.

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्च रोजी भाजपतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे त्यानिमित्ताने मुंबई भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत मार्गदर्शन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी जी, खा. मनोज कोटक आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते’, असं ट्वीट करत 9 मार्च रोजी मलिक यांच्या मागणीसाठी भाजप भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.

शेतकरी प्रश्नावरूनही फडणवीसांचा इशारा

‘शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करून एकरकमी एफआरपी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशा अनेक मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू’, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भाजप प्रदेश किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते.

सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले- पाटील

‘शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडावे असे वाटत नाही. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे’, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

इतर बातम्या : 

निवडणूक आयोगाचे अधिकार कमी होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

Budget Session : अभूतपू्र्व गोंधळानंतर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला! कोणत्या विषयांवर चर्चा?