“… तर भाजप विचार करेल” संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

"भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल," असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

... तर भाजप विचार करेल संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान
SUDHIR MUNGANTIWAR COMMENT
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 9:49 PM

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीवर भाष्य करताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,” असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ते नागपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (BJP will think only when Shivsena comes towards us BJP leader Sudhir Mungantiwar comments on Sanjay Raut and Ashish Shelar secret meeting)

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ?

“भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दोन नेते एकमेकांना भेटू शकतात : प्रविण दरेकर

आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्यात भेट झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राऊत आणि शेलार भेटीचं गूढ जास्तच वाढलं. “गेल्या काही दिवसांपासून काही भेटीगाठी सुरू आहेत. पण या भेटीत एक नेतृत्व कायम आहे. ते म्हणजे संजय राऊत. पण राऊत आणि शेलार यांनी भेटीचं खंडन केलं आहे. भेट झाली नसेल तर त्यावर तर्कवितर्क करणं चुकीचं आहे,” असं प्रविण दरेकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना तुमच्याकडे फुटेज असले तरी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राऊत-शेलार भेटीच्या चर्चेत हवा फुंकल्यासारखं झालं आहे.

राऊत-शेलार यांच्यात अर्धा तास खलबतं

दरम्यान, आज संजय राऊत यांच्यात मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात अर्धा तास बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक नेमकी कशामुळे झाली ? चर्चेचा विषय काय होता ? या सर्व गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील तपशील समजू शकला नसला तरी त्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना कॅमेऱ्यानं टिपल्यामुळे काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

पवार-अमित शाह भेट, ठाकरे- मोदी, फडणवीस-शाह, ते राऊत- शेलार भेट, आतापर्यंत किती गुप्त भेटी?

मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय?

संभाजी छत्रपती म्हणतात, प्रश्न विचारायचे असतील तर मुख्यमंत्री करा; आता धनंजय मुंडे म्हणाले…

(BJP will think only when Shivsena comes towards us BJP leader Sudhir Mungantiwar comments on Sanjay Raut and Ashish Shelar secret meeting)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.