मुंबई : “आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation elections) भाजप ताकदीने लढणार आहे. या वेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल” असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (BJP will win Mumbai Municipal Corporation elections said Praveen Darekar)
“बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. जे एक्झिट पोल सांगितले जात होते. त्याचे तीन-तेरा वाजले. भाजपला सायलेंट व्होटर्सनी भरभरुन मत दिलं. यावेळची मुंबई महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. मुंबई मनपावर यावेळी भाजपचाच झेंडा फडकणार” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
यावेळी बिहार निवडणुकीवर बोलताना प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “भाजपचा विरोध करणाऱ्यांचे सर्व अंदाज चुकले आहेत. एक्झिट पोलचेही तीनतेरा वाजले आहेत. बिहारच्या निकालामुळे राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा भ्रमनिरास झाला आहे. सायलेंट व्होटर्सचा बिहारमध्ये मोदी यांच्या कामाला पाठिंबा राहीला. देशभरातून भाजपला जनतेचा पाठिंबा आहे, हे बिहारच्या निवडणुकीवरुन समजलं आहे.” असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. ‘महापालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत. मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे ते शेलार म्हणाले होते. तसेच, देवेंद्र फडणवीस पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याची माहितीही आशिष शेलार यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु
विधानपरिषद निवडणूक : घोषणा करतावेळीच या उमेदवारांच्या विजयाची जयंत पाटलांना खात्री
(BJP will win Mumbai Municipal Corporation elections said Praveen Darekar)