लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विजयी, पण काँग्रेसला फायदा!

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर लडाखमध्ये पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. असं असलं तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपच्या जागांमध्ये घट झाली आहे. तर काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.

लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विजयी, पण काँग्रेसला फायदा!
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 7:47 AM

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून कलम 370  हटवल्यानंतर भाजपने लडाखमधील पहिलीच निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत भाजपला 15 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. तर दोन अपक्ष विजयी ठरले. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या एकूण 26 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. जम्मू-काश्मीरमधून स्वतंत्र होत लेह आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर लडाखमधील ही पहिलीच निवडणूक होती. (BJP wins Ladakh polls, but loses seats)

लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषेदेची निवडणूक गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत एकूण 65 टक्के मतदान झाले. 26 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ९४ उमेदवार उभे होते.

लेह आणि लडाखमध्ये आधीही भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. या भागावर आत्तापर्यंत कायम अन्याय झाला होता असे भाजपाने कलम 370 हटवितांना म्हटले होते. आत्तापर्यंत विकासाबाबत सगळा भर फक्त जम्मू आणि काश्मीर खोऱ्यावरच दिला गेला. पण लेह-लडाखकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला होता. लेह आणि लडाख या परिसरात नेहमीच भाजपचा वरचष्मा राहिलेला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवताना भाजपनं लडाखवर नेहमीच अन्याय झाल्याचं म्हटलं होतं. तसंच आतापर्यंत जम्मू-काश्मीरवरच भर दिला गेला. मात्र, निसर्गसंपन्न अशा लेह-लडाखकडे कायम दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप भाजपनं त्यावेळी केला होता.

भाजपचा विजय पण जागांमध्ये घट

लडाखमध्ये 26 पैकी 15 जागा जिंकत भाजप विजयी ठरला असला तरी त्यांच्या जागांमध्ये मात्र घट झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. त्यात घट होऊन यावेळी भाजपने 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या जागा 5 वरुन 9 वर पोहोचल्या आहेत. त्यामुळं भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी भाजपच्या जागांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान फारुक अब्दुल्ला यांचा NC आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या PDPने या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

मेहबुबा मुफ्तींच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं वातावरण तापलं

पीडीपी (PDP) पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जम्मू काश्मीरमधील युवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जम्मूमधील युवकांनी रविवारी पीडीपीच्या (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी) कार्यालयासमोर तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत मेहबुबा मुफ्तींविरोधात निषेध नोंदवला. रविवारी (25 ऑक्टोबर) जम्मू येथील मेहबुबा मुफ्ती यांच्या कार्यालयासमोर काही युवकांनी तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच युकांनी मोर्चा काढत मेहबुबा मुफ्तींविरोधात निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केलां. पण परिस्थिती चिघळू नये म्हणून जम्मू पोलिसांनी या युवकांना रोखलं.

संबंधित बातम्या:

देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

BJP wins Ladakh polls, but loses seats

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.