BJP Celebration: उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपला आनंद गगनात मावेना! जल्लोष साजरा करत फडणवीसांना भरवले पेढे

| Updated on: Jun 29, 2022 | 10:23 PM

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढे भरवताना व्हिडिओत दिसत आहे. भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात विकासपर्व सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. नवं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोकणाचा, सिंधुदुर्गचा आणि महाराष्ट्राचा विकास करतील असेही राणे म्हणाले.

BJP Celebration: उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपला आनंद गगनात मावेना! जल्लोष साजरा करत फडणवीसांना भरवले पेढे
1 जुलैला पार पडणार फडणवीस सरकारचा शपथविधी!
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

मुंबई : अखेर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा(resignation as Chief Minister) दिला आहे. भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडण्याचे प्रयत्न करत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजप नेते या क्षणाची वाट पाहत होते. अखेरीस या राजीनाम्यानंतर आनंद गगनात मावेना अशी अवस्था भाजप नेत्यांची झाली आहे. भाजप कडून या क्षणाचा जल्लोष साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला. भाजपच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे.

महाराष्ट्रात विकासपर्व सुरु होणार असल्याची भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढे भरवताना व्हिडिओत दिसत आहे. भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात विकासपर्व सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. नवं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोकणाचा, सिंधुदुर्गचा आणि महाराष्ट्राचा विकास करतील असेही राणे म्हणाले.

पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली म्हणत उद्धव ठाकरेंनी कातरत्या आवाजात मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कॅबिनेटची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची शेवटची ठरली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रावादी आणि काँग्रेसने साथ दिली.  यांनतर हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.