भाजप आणि काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत, संजय देवतळे, चंद्रकांत रघुवंशी शिवबंधनात

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे (Sanjay Deotale), तसेच काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकात रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

भाजप आणि काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत, संजय देवतळे, चंद्रकांत रघुवंशी शिवबंधनात
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 3:19 PM

मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे (Sanjay Deotale), तसेच काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकात रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात विशेषत: धुळे-नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.  तर संजय देवतळे यांना शिवसेनेने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

संजय देवतळे हे 3 टर्म आमदार होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या संजय देवतळे यांचा तत्कालिन शिवसेनेचे उमेवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. सध्या बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये आहेत. वरोरा विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे संजय देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

चंद्रकात रघुवंशी

  • नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार असलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी काल आपल्या पदांचा राजीनामा दिला. ते आज शिवसेनेत दाखल झाले.
  • चंद्रकांत रघुवंशी यांची काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख होते.
  • गेल्या 20 वर्षांपासून ते काँग्रेसची नंदुरबारची धुरा सांभाळत आहेत
  • चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील कॅबटेसिंह रघुवंशी हे तीनवेळा काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
  • लोकसभा निवडणुकीत प्रकृतीच्या कारणास्तव ते प्रचारापासून लांब होते
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.