VIDEO: स्मृती इराणींच्या सभेत वळू घुसला, अनेकांना पळताभुई थोडी

कानपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देशभरातील चौकाचौकात राजकीय पक्षांचे झेंडे आणि कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. नुकतंच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रचारसभा पार पडली. मात्र या प्रचारसभेत एकच गोंधळ उडाला. स्मृती इराणींच्या सभेत अचानक एक वळू घुसला. भर सभेत भल्या गर्दीत अचानक वळू घुसल्याने एकच खळबळ […]

VIDEO: स्मृती इराणींच्या सभेत वळू घुसला, अनेकांना पळताभुई थोडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

कानपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देशभरातील चौकाचौकात राजकीय पक्षांचे झेंडे आणि कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. नुकतंच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रचारसभा पार पडली. मात्र या प्रचारसभेत एकच गोंधळ उडाला. स्मृती इराणींच्या सभेत अचानक एक वळू घुसला.

भर सभेत भल्या गर्दीत अचानक वळू घुसल्याने एकच खळबळ उडाली. इतकी गर्दी पाहून वळू बिथरला आणि सैरावैरा धावू लागला. गर्दीमुळे त्याला वाट काढणंही जिकीरीचं झालं. या वळूने अनेकांना मारत, तुडवत, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

एकीकडे स्मृती इराणी भाषण देत होत्या, तर दुसरीकडे हा वळू धिंगाणा घालत होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

15 मिनिटे खळबळ स्मृती इराणींसाठी विजय शंखनाद सभेचं आयोजन केलं होतं. या जाहीर सभेला स्मृती इराणी संबोधित करत होत्या. त्याचवेळी अचानक एक वळू सभास्थळी घुसला. त्यामुळे एकच पळापळ झाली. सभास्थळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी 15 मिनिटे मोठी कसरत करुन, या वळूवर ताबा मिळवत, त्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं.

या सर्व धावपळीत रजनी नावाची महिला गंभीररित्या जखमी झाली आहेत. तर अर्धाडजनपेक्षा अनेकांना दुखापत झाली आहे.

VIDEO:

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....