सोलापूरचं महापौरपद भाजपने राखलं, श्रीकांचना यन्नम महापौरपदी, शिवसेनेचंही 1 मत भाजपला!

सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद भाजपने राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

सोलापूरचं महापौरपद भाजपने राखलं, श्रीकांचना यन्नम महापौरपदी, शिवसेनेचंही 1 मत भाजपला!
Follow us
| Updated on: Dec 04, 2019 | 12:55 PM

सोलापूर :  सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद भाजपने राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. श्रीकांचनमा यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) यांना 51 मते मिळाली. तर विरोधातील एमआयएमचे उमेदवार शाहीजदा बानू शेख यांना केवळ आठ मते मिळाली. महत्त्वाचं म्हणजे  भाजपच्या 49 नगरसेवकांची श्रीकांचना यन्नम यांची मतं मिळालीच, पण शिवसेना आणि बसपच्या  प्रत्येकी एका नगरसेवकानेही भाजपला मतदान केलं. काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 4 बसापाचे 3 आणि शिवसेनेचे 20 नगरसेवक तटस्थ राहिले.

महाराष्ट्रात पदमशाली समाजाच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान श्रीकांचना यन्नम यांना मिळाला आहे.

दरम्यान काँगेस आमदार प्रणिती शिंदे यांनी काल सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर होणार असल्याचा दावा केला होता. सोलापूर महानगरपालिकेसाठी आज महापौरपदाची निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी दावा केल्याने, आजच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बाजी मारत, महापौरपद कायम ठेवण्यात यश मिळवलं.

सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल • भाजप 49 • शिवसेना 21, • काँग्रेस 14 • राष्ट्रवादी 04 • MIM – 08 • माकप – 01 • अपक्ष/इतर – 04 • रिक्त – 01 • एकूण = 102

संबंधित बातम्या  

सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीची रणनीती, महापौर आमचाच, प्रणिती शिंदेंचा दावा 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.