सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद भाजपने राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. श्रीकांचनमा यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) यांना 51 मते मिळाली. तर विरोधातील एमआयएमचे उमेदवार शाहीजदा बानू शेख यांना केवळ आठ मते मिळाली. महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या 49 नगरसेवकांची श्रीकांचना यन्नम यांची मतं मिळालीच, पण शिवसेना आणि बसपच्या प्रत्येकी एका नगरसेवकानेही भाजपला मतदान केलं. काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 4 बसापाचे 3 आणि शिवसेनेचे 20 नगरसेवक तटस्थ राहिले.
महाराष्ट्रात पदमशाली समाजाच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान श्रीकांचना यन्नम यांना मिळाला आहे.
दरम्यान काँगेस आमदार प्रणिती शिंदे यांनी काल सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर होणार असल्याचा दावा केला होता. सोलापूर महानगरपालिकेसाठी आज महापौरपदाची निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी दावा केल्याने, आजच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बाजी मारत, महापौरपद कायम ठेवण्यात यश मिळवलं.
सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल
• भाजप 49
• शिवसेना 21,
• काँग्रेस 14
• राष्ट्रवादी 04
• MIM – 08
• माकप – 01
• अपक्ष/इतर – 04
• रिक्त – 01
• एकूण = 102
संबंधित बातम्या
सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीची रणनीती, महापौर आमचाच, प्रणिती शिंदेंचा दावा