फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
बिहार निवडणुकीत भाजपाने संघटन उभारलं. देवेंद्र फडणवीसांनी च्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नागपूर : बिहार निवडणुकीत भाजपने संघटन उभारलं. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत स्पष्ट होतील. मतमोजणी अजूनही सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजप आपला मित्रपक्ष असेलेल्या जदयूच्याही पुढे असल्याचं दिसतंय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर भाजपच्या या यशाचे श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळत असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, थोडा वेळ वाट पाहा. बिहारमध्ये महागठबंधनलाच स्पष्ट बहुमत मिळणार असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज झा यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :