Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हॅनिटी व्हॅन नाही पाहिली तर काय पाहिलं?
आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे शिंदे गटासह शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.
गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बीकेसीवर भाषण (Dussehra Melava at BKC) करतील. आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत शिंदे गट बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतोय. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. लाखो खुर्च्या, भव्य व्यासपीठ, पार्किंगची भलीमोठी सोय, जेवणाची व्यवस्था, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, या सगळ्याची लगबग बीकेसीच्या (BKC Ground) मैदानावर सुरु आहे. यात एक महत्त्वाची गोष्टही टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्याने टिपली. ती गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांची व्हॅनिटी व्हॅन.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक व्हॅनिटी व्हॅनही तैनात करण्यात आली आहे. या व्हॅनिटी व्हॅनचा टीव्ही 9 मराठीने एक्स्क्लुझिव्ह आढावा घेतलाय. या व्हॅनिट व्हॅनमध्ये दोन छोट्या रुम, दोन एसी, आरसा, सोफा, ओव्हन, बेसिन अशा अनेक बाबी दिसून आल्या आहेत.
दसरा मेळाव्याआधी एखादी छोटेखानी बैठक घेता येऊ शकेल, अशी सोय या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे. बीकेसीतील सभेमध्ये बोलण्याआधी तयार व्हायला म्हणून ही व्हॅनिटी व्हॅन आणण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. थोडा वेळ आरामही करता येऊ शकेल, अशीही सोय या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे. अत्याधुनिक सुविधेने सज्ज असलेल्या या व्हॅनिटी व्हॅनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
पाहा व्हिडीओ :
एकीकडे मुख्यमंत्र्यांची व्हॅनिटी व्हॅन सज्ज आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरही आमदार आणि नेते मंडळींसाठीही 2 व्हॅनिटी व्हॅन तैनात ठेवण्यात आल्यात. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी या दोन व्हॅनिटी व्हॅनचा आढावा घेतलाय.
पाहा व्हिडीओ :
शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गट करत आहेत. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाची शिवाजी पार्कासाठीची परवानगी फेटाळून लावली होती. त्यानंतर बीकेसीवरच दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाकडून तयारी करण्यात आली.
ही तयारी अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. या दोन्ही मेळाव्यात शिंदे आणि ठाकरे नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.