Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ashok Nagar Ward 154 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी, शिवसेना दुभंगल्यानंतर महापालिकेवर कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न साकार होणार?

शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 154 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

BMC Election 2022 Ashok Nagar Ward 154 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी, शिवसेना दुभंगल्यानंतर महापालिकेवर कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न साकार होणार?
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:33 PM

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आता महापालिका निवडणुकांकडे (Municipal Elections) सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) कमळ फुलवण्यासाठी भाजपनं सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्णय घेतलाय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नेमणूक केली आहे. मुंबई भाजप अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच शेलार यांनीही ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. दुसरीकडे शिंदेंच्या बंडाळीनंतर संघटन मजबूत करण्याकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कल आहे. अशावेळी मुंबई महापालिकेवरील जवळपास 25 वर्षाची सत्ता कायम ठेवण्याचं भलं मोठं आव्हान ठाकरे पिता-पुत्रांसमोर आले. त्यातच शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 154 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

प्रभाग क्रमांक 154 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 154 मधील एकूण लोकसंख्या 50 हजार 391 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 7 हजार 616, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 335 इतकी आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार :

महादेव शंकर शिवगण – भाजप – 8,086 मते (विजयी) अभिषेक किसन मिस्त्री – काँग्रेस – 5,676 मते शेखर विष्णू चव्हाण – शिवसेना – 5,673 मते विजय भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस – 4,588 मते माऊली थोरवे – मनसे – 1,399 मते

प्रभाग क्रमांक 154 च्या सीमा :

उत्तरेला प्रभाग क्रमांक 153 नाला, पूर्वेला प्रभाग क्रमांक 144 नाला, एम/पूर्व व एम/पश्चिम विभाग सामाईक, दक्षिणेला प्रभाग क्रमांक 156 हार्बस लाईन, तर पश्चिमेला प्रभाग क्रमांक 155, 153 पूर्व द्रूतगती महामार्ग.

प्रभाग क्रमांक 154 ची व्याप्ती :

पूर्व द्रुतगती महामार्ग व मुंजालनगर कॉम्प्लेक्सच्या दक्षिण कुंपणभिंतीच्या नाक्यापासून, तेथून उक्त कुंपणभिंतीच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे श्रीनगर कॉम्प्लेक्सच्या पश्चिम कुंपणभिंतीपर्यंत, तेथून उक्त कुंपणभिंतीच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे, दक्षिणबाजूने पूर्वेकडे व पूर्वबाजूने उत्तरेकडे नाल्यापर्यंत, तेथून उक्त नाल्याच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे छेडानगर रोड क्र. 3 पर्यंत, तेथून छेडानगर रोड क्र. 3 च्या पूर्वबाजूने उत्तरेकडे व दक्षिणबाजूने पूर्वेकडे ‘एम/पश्चिम’ व ‘एम/पूर्व’ विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (नाला), तेथून उक्त सीमेच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे हार्बर रेल्वे लाईन्सपर्यंत, तेथून हार्बर रेल्वे लाईन्सच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत, तेथून पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे मुंजालनगर कॉम्प्लेक्सच्या दक्षिण कुंपणभिंतीपर्यंत… म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत.

सदर प्रभागात राहूलनगर, बी. एम. सी. कॉलनी, ज्योतीनगर, न्यु गरीब जनतानगर या प्रमुख ठिकाणे/वस्ती/नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.