BMC Election 2022 Khardanda Ward 99 : राज्यातील सत्तापालटानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, प्रभाग क्रमांक 99 कडे मुंबईकरांचं लक्ष

यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

BMC Election 2022 Khardanda Ward 99 : राज्यातील सत्तापालटानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, प्रभाग क्रमांक 99 कडे मुंबईकरांचं लक्ष
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 10:34 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली आहे. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. दुसरीकडे भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई महापालिकेतून ठाकरेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 2017 नंतर आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपनं सर्व जबाबदारी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे दिल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच शेलार यांनीही भाजपचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

प्रभाग क्रमांक 99 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 99 मधील एकूण लोकसंख्या 54 हजार 135 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 484, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 134 इतकी आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार :

2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 99 मधून शिवसेनेचे अगलदरे संजय गुलाबराव हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 9 हजार 360 मतं पडली होती. तर त्यांच्यानंतर भाजपचे भानजी जयेंद्र गजेंद्र, काँग्रेसचे संबुटवाड व्यंकटेश नागनाथराव हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.

प्रभाग क्रमांक 99 च्या सीमा :

उत्तरेला प्रभाग क्रमांक 97 खार रेल्वे लाईन इस्ट वेस्ट फुट ओव्हर, पूर्वेला प्रभाग क्रमांक 98 आणि 95, अनंत तारकर रोड, खेरवाडी रोड, डायमा मार्ग. दक्षिणेला जी/उत्तर विभागाची आणि एच/यू विभागाची मिठी नदी, तर पश्चिमेला एच/प विभागाची व एच/यू विभागाची पश्चिम रेल्वे लाईन

प्रभाग क्रमांक 99 ची व्याप्ती :

उत्तरेकडे असलेल्या अनंत काणेकर मार्ग व कलानगर उड्डाणपूल ( मेट्रो पॉलिटन कोर्ट ) जंक्शनपासून, कलानगर उड्डाणपूलाच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे सायन बांद्रा लिंक रोडपर्यंत. तेथून सायन बांद्रा लिंक रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे मिठी नदीपर्यंत. तेथून मिठी नदीच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे पश्चिम रेल्वे लाईनच्या खाडीवरील पुलापर्यंत. तेथून पूर्वबाजूने उत्तरेकडे वेर्स्टन एक्सप्रेस हाईवे ओलांडून पश्चिम रेल्वे लाईनवरून घास बाजार रोडपर्यंत. तेथून घास बाजार रोडने पश्चिम रेल्वे लाईनच्या कुंपण भींतीच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे खार रेल्वे लाईन इस्ट वेस्ट फुट ओव्हर पब्लिक ब्रीजपर्यंत. तेथून दक्षिणबाजूने पूर्वेकडे गोळीबार रोडपर्यंत. तेथून गोळीबार रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे स्टेशन रोडने बांद्रा टर्मिनलमधील रोडने रेल्वे कॉलनीपर्यंत. तेथून पश्चिमबाजूने पूर्वेकडे पाईपलाईन व नाला ओलांडून पाऊलवाटेने पूढे खेरवाडी रोडने (डायमा मार्ग) शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे रोड नं 8 च्या जंक्शन पर्यंत. तेथून रोड नं. 8 लगत असलेल्या न्यु एम आय जी (इमारती वगळून ) इमारतीच्या कुंपण भिंतीच्या मोकळया पाऊल वाटेने अनंत तारकर रोडपर्यंत. तेथून अंनत तारकर रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे बस डेपोच्या कुंपण भींतीपर्यंत ( बस डेपो वगळूण ) . तेथून बस डेपोच्या कुंपण भींतीलगतच्या मोकळया जागेच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे ( कापरी इमारत समविष्ट ) बस डेपो गेट व अनंत कानेकर मार्गापर्यंत. तेथून अनंत काणेकर मार्गाच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात बेहराम पाडा, घास बाजार परिसर, या प्रमुख ठिकाणे / वस्ती/नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.