BMC Election 2022 Aakurli Nagar Ward 29 : आकुर्ली नगर वार्ड क्रमांक 29 सर्वसाधारण महिलासाठी राखीव, विद्यमान नगरसेवकाची डोकेदुखी वाढली

मतदारसंघाचे चित्रं स्पष्ट झाल्याने वॉर्डाच्या बांधणीसाठी स्थानिक नगरसेवक आणि इच्छुकांना वेळ मिळाला आहे. तसेच ज्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत, ते आता नवा मतदारसंघ मिळावा म्हणून जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत.

BMC Election 2022 Aakurli Nagar Ward 29 : आकुर्ली नगर वार्ड क्रमांक 29 सर्वसाधारण महिलासाठी राखीव, विद्यमान नगरसेवकाची डोकेदुखी वाढली
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:02 PM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) वारे वाहू लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची आरक्षण सोडतही नुकतीच जाहीर करण्यात आलीय. त्यात अनेक दिग्गजांचे वार्ड आरक्षित झाले आहेत, तर अनेकांना वॉर्ड सुरक्षित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांचे वार्ड आरक्षित (Ward Reservation) झाले त्यांनी आता दुसऱ्या वार्डाची शोधमोहीम सुरु केलीय. तर ज्यांचे वार्ड सुरक्षित राहिले आहेत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडत निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघाचे चित्रं स्पष्ट झाल्याने वॉर्डाच्या बांधणीसाठी स्थानिक नगरसेवक (Corporators) आणि इच्छुकांना वेळ मिळाला आहे. तसेच ज्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत, ते आता नवा मतदारसंघ मिळावा म्हणून जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत. आर साऊथ वार्ड क्रमांक 29 आकुर्ली नगर सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे विद्यमान भाजप नगरसेवक सागर रमेशसिंग ठाकूर यांची डोकेदुखी वाढली आहे. सागर ठाकूर यांना आता दुसऱ्या वार्डाचा शोध घ्यावा लागणार आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. त्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 29 मधून सागर ठाकूर यांनी विजय मिळवला होता.

दिग्गजांचा पराभव

सागर ठाकूर यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण मोरे, काँग्रेसचे रामाशिश गुप्ता, मनसेचे सुशील गुंजे यांचा पराभव केला होता.

हे सुद्धा वाचा

2017 च्या निवडणुकीत कुणाला किती मतं?

  • सतीश मनोहर देसाई – अपक्ष – 934
  • रामअशीश गुप्ता – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 3956
  • गुंजे सुशील प्रकाश – मनसे – 538
  • कुराडे लक्ष्मण यलप्पा – बहुजन विकास आघाडी – 18
  • किरण पुरुषोत्तम मोरे – एनसीपी – 90
  • सचिन पाटील – शिवसेना – 5231
  • ठाकूर सागर रमेश सिंह – भाजप – 8043
  • मुकेश बसंतीलाल पामेचा – अपक्ष – 1977
  • नोटा – 273
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड कुठून कुठपर्यंत?

या वार्डात विश्वकर्मा मंदिर, मायाक्का देवी मंदिर, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह, फिश मार्केट, साई समाधान हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर येतो. उत्तरेकडून आकुर्ली रोड व हनुमान नगर रोड जंक्शनपासून हनुमान नगर रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे मालाड रोड पर्यंत. तेथून दक्षिणबाजूने पूर्वेकडे व पुन्हा पूर्वबाजूने उत्तरेकडे | झोपडपट्टीच्या पायवाटेने व पुन्हा दक्षिणबाजूने पूर्वेकडे (म्युनिसीपल गार्डन ) बजाज इस्टेट रोडपर्यंत. तेथून बजाज इस्टेट रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे आकुर्ली क्रॉस रोडपर्यंत. तेथून आकुर्ली क्रॉस रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे गोकुळ नगर रोडपर्यंत. तेथून गोकुळ नगर रोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे मालाड रोड ओलांडून मोकळ्या जागेतून पुढे शिवाजी नगर रोड ओलांडून झोपडपट्टीच्या पायवाटेने तानाजी नगर रोडपर्यंत. तेथून तानाजी नगर रोडच्या पश्चिमबाजूने | दक्षिणेकडे झोपडपट्टीच्या गल्लीपर्यंत व तेथून पूर्वबाजूने उत्तरेकडे झोपडपट्टीमधील पायवाटेने व पुन्हा दक्षिणबाजूने पूर्वेकडे मोकळ्या जागेतून पून्हा पूर्वबाजूने उत्तरेकडे झोपडपट्टीला लागून व | मोकळ्याजागेतून रोड नं 1 ने पुढे दक्षिणवाजूने पूर्वेकडे तानाजी नगर रोडपर्यंत (राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक). तेथून तानाजी नगर रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे वडारपाडा रोड नं 2 | पर्यंत. तेथून वडारपाडा रोड नं 2 च्या पूर्वबाजूने उत्तरेकडे आकुर्ली रोडपर्यंत. तेथून आकुर्ली रोडच्या | दक्षिणवाजूने पूर्वेकडे हनुमान नगर रोडपर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात हनुमान नगर, वडार पाडा या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश होतो.

वार्डात किती लोकसंख्या?

या वार्डातील एकूण लोकसंख्या 52 हजार 473 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 759, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 636 इतकी आहे.

वॉर्ड आरक्षित की खुला?

महापालिका प्रशासनाने 2022च्या पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. त्यात हा वॉर्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे सागर ठाकूर यांना या वॉर्डातून उभे राहता येणार नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वार्डाचा शोध घ्यावा लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.