BMC Election 2022 Nityanand Nagar Ward 126 : सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, सर्व पक्ष वेगळे लढणार की भाजप – शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार?

| Updated on: Aug 15, 2022 | 11:00 PM

यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

BMC Election 2022 Nityanand Nagar Ward 126 : सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, सर्व पक्ष वेगळे लढणार की भाजप - शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार?
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली आहे. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Election) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. दुसरीकडे भाजप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत मुंबई महापालिकेतून ठाकरेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 2017 नंतर आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपनं सर्व जबाबदारी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे दिल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच शेलार यांनीही भाजपचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

प्रभाग क्रमांक 126 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 126 मधील एकूण लोकसंख्या 48 हजार 210 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 6 हजार 574, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 87 इतकी आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार :

2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 126 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डॉ. अर्चना संजय भालेराव या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 12 हजार 759 मतं मिळाली होती. तर त्यांच्यानंतर 6 हजार 89 मतांसह भाजपच्या पुनम बोराटे दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेच्या स्वातीताई सुनील शितप 5 हजार 623 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

प्रभाग क्रमांक 126 च्या सीमा :

उत्तरेला प्रभाग क्रमांक 125 एस व एन विभागाची सामाईक सीमा, पूर्वेला प्रभाग क्रमांक 123, 125 एस व एन विभागाची सामाईक सीमा, दक्षिणेला प्रभाग क्रमांक 127 विक्रोळी पार्क साईट रोड क्र. 1, तर पश्चिमेला प्रभाग क्रमांक 125, 127 विक्रोळी पार्क साईट रोड क्र. 3, दत्त मंदिर

प्रभाग क्रमांक 126 ची व्याप्ती :

हिरानंदानी लिंक रोड व विक्रोळी पार्क साईड रोड नं. 7 च्या नाक्यापासून, तेथून विक्रोळी पार्कसाईट रोड नं. 7 च्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे विक्रोळी पार्क साईड रोड नं-1 पर्यंत, तेथून उक्त रोडच्या पूर्वबाजूने पश्चिमेकडे रोड नं. 3 पर्यंत, तेथून रोड नं 3 च्या पूर्वबाजूने उत्तरेकडे अक्सा मस्जिदच्या संरक्षणर्भितीने पूर्वबाजूने उत्तरेकडे दत्तमंदिर रोडपर्यंत, तेथून दत्तमंदिर रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे झोपडपटटीमधील पायवाटेने पूर्वबाजूने उत्तरेकडे तेथून पुढे उत्तरबाजूने पश्चिमेकडे हेलीपॅडपर्यंत, तेथून हेलीपॅडच्या संरक्षणभिंतीने उत्तरेकडे टाटा पॉवर हिरानंदानी डी.एस.एस. च्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे हिरानंदानी लिंक रोडपर्यंत, हिरानंदानी रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे ‘एन’ व ‘एस’ विभागाच्या सामाईकसीमेने, उक्त सीमेच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे, पश्चिमबाजूने दक्षिणेकडे व उत्तरबाजूने पश्चिमेकडे व पश्चिमबाजूने दक्षिणेकडे आणि दक्षिणवाजूने पूर्वेकडे हिरानंदानी लिंक रोडपर्यंत, तेथून हिरानंदानी रोडच्या पश्चिमबाजूने विक्रोळी पार्क साईट रोड नं. ७ पर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात कैलास बिझीनेस पार्क, वर्षानगर, वुडन बॉक्स, शिवाजीनगर, सागरनगर या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर