BMC Election 2022 Spring Mill Compound (ward201) : 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुप्रिया मोरे आपले स्थान टिकवून ठेवणारा का?

| Updated on: Jun 20, 2022 | 9:09 AM

स्प्रिंग मिल कंपाउंड वार्ड सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्यानं महिला  उमेदवारात नेमक कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुप्रिया मोरे यांनी 7 हजार406 मते मिळवत ही निवडणूक जिंकली होती.

BMC Election 2022 Spring Mill Compound (ward201) : 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुप्रिया मोरे आपले स्थान टिकवून ठेवणारा का?
BMC Ward 201
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला (Mumbai municipal corporation elections )आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणची सोडत झाल्यानंतर नंतर काही वार्ड राखीव झाले तर काही खुले राहिल्याने निवडणुकीत चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (Shiva sena )यांच्यातील कट्टर लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्प्रिंग मिल कंपाउंड वार्ड सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्यानं महिला  उमेदवारात नेमक कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीत (election) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुप्रिया मोरे यांनी 7 हजार406 मते मिळवत ही निवडणूक जिंकली होती. या वॉर्डात समाजवादी पार्टीचे सिद्धकी इरम साजिद अहमद यांनी चार हजार 619 मते मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. तर शिवसेनेचे उमेदवार अश्विनी दरेकर यांना 3575 मध्ये मिळाले होते. वरील पक्षांच्या बरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.

2017 च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो

दरेकर अश्विनी विजय – शिवसेना -3575 ,

ज्योती प्रकाश जगताप – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -203,

हे सुद्धा वाचा

मलिक शहनाज सिराज अहमद -ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन -1826,

मोरे सुप्रिया सुनील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -7406,

रणखांबे पुष्‍पा आनंद- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 730 ,

सविता विनोद सलावे- भारतीय जनता पार्टी- 1690,

शांभवी हेमंत सावंत- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 330,

सिद्दीकी इरम साजिद अहमद- समाजवादी पार्टी – 4 हजार 619

रुबीना खालिद सिद्धकी – अपक्ष – 112

मतदार संघाची लोकसंख्या

या मतदार संघाची लोकसंख्या 52 हजार 880 इतकी असून यामध्ये अनुसूचित जातीचे 4841 अनुसूचित जमातीचे 288 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत वीस हजार 774 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डात  स्प्रिंग मिल कंपाउंड, पोलीस कॉलनी, बी.पी.टी. कॉलनी, म्हाडा कॉलनी, बी.पी.सी.एल. कॉम्प्लेक्स. परिसराचा समावेश होतो